Skip to main content
प्रजासत्ताक दिनी पालक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या जन संपर्क कार्यालय वर आयटक चा विशाल आक्रोश जवाब दो!मोर्चा.आशा वर्कर गट प्रवर्तक व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा जी आर काढण्याची मागणी.अन्यथा मुंबईत मुक्कामी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. कॉ.विनोद झोडगे.चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण चंद्रपूर:-महाराष्ट्रात आयटक व संयुक्त कृती समितीच्या वतीने आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांच्या विविध मागण्या घेऊन 18 /10/2023 ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता तेव्हा सरकारने घोषणा करून आशा वर्कर ला 7 हजार रु . गट प्रवर्तक ला 10 रू. दोन हजार रु.दिवाळी बोनस, गट प्रवर्तक महिलांना कंत्राटी कामगार दर्जा ,आरोग्य वर्धीनी 1500 रू .लागू करण्याची घोषणा केली होती.तर शालेय पोषण आहार कर्मचाऱयांना फक्त मासिक 2500 रू. मिळतो तेव्हा प्रचंड वाढलेल्या महागाई काळात त्यांनी जगावे कसे? असे म्हणत त्यांनी सुधा आक्रमक भूमिका स्वीकारली होती.तेव्हा याची दखल घेत मा.दीपक केसरकर शिक्षण मंत्री यांनी त्यांच्या मानधनात 1500 रू.वाढ करण्याचे जाहीर केले होते परंतु त्यांनाही काही मिळाले नाही तसेच 2 महिने उलटूनही आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचा जी आर निघाला नाही त्यामुळे सरकार प्रती तीव्र संताप व्यक्त करत परत 12 जानेवारी पासून राज्यव्यापी संप सुरू केला परंतु अजूनही सरकारने दखल न घेतल्याने संपाच्या 15 व्या दिवशी ऑल इंडीया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) शाखा-चंद्रपूरच्या वतीने कॉ. विनोद झोडगे, राज्य सचिव तथा जिल्हा सचिव आयटक यांच्या नेतृत्वात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी याना किमान वेतन, मानधनात वाढ, दिवाळी बोनस व इतर मागण्यांना घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी (प्रजासत्ताक दिनी) 26 जानेवारी रोजी आझाद बगीचा चंद्रपूर येथून सकाळी 12 वाजता निघून जिल्हाधिकारी नियोजन भवन कार्यालय पर्यन्त विशाल जवाब दो !मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सदर मोर्चात राज्य उपाध्यक्ष कॉ.देवराव चवळे, रवींद्र उमाटे-जिल्हा कार्याध्यक्ष, राजू गईनवार, प्रकाश रेड्डी-जिल्हा कार्यकारीणी सदस्य, कॉ.निकिता निर, कॉ वनिता कुंठावार,कुंदा कोहपरे ,फर्जना शेख-आशा गटप्रवर्तक संघटना,सरिता नैताम जिल्हा सचिव आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना गडचिरोली ,सविता गठलेवार,श्रीधर वाढई,सविता बोबडे,निर्मला गुरणुले,कल्पना मिलमिले, सुहासनी वाकडे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाला मार्गदर्शन करताना सरकार ने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येत्या 4 दिवसांत आशा व गटप्रवर्तकाच्या मागण्यांच्या सरकारने GR काढला नाही तर महाराष्ट्रात आयटक व संयुक्त आशा वर्कर व गटप्रवर्तक कृती समिती च्या वतीने संपूर्ण मुंबई जाम करून आंदोलन करू असा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी शासनाला दिला आहे. सदर मोर्चा मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेटल्याशिवाय हे ठिय्या आंदोलन संपविणार नाही असा आंदोलनकर्त्यांनी पवित्रा घेतल्याने शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे सायंकाळी 18.50 ते 19.10 पर्यंत कॉ विनोद झोडगे, कॉ देवराव चवळे ,रवींद्र उमाटे,निकीता निर, फर्जना शेख,सविता गठलेवार,रेखा ताजने,रेखा भोयर,कल्पना मिलमिले यांच्या शिष्टमंडळने श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री यांची भेट घेऊन शासनाने दिलेल्या आश्वासनांचा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत ,शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर GR करण्यासंबंधी आपण मध्यस्थी करून आशा वर्कर व गटप्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा मुद्दा मार्गी लावावा अशी चर्चा करून मागन्या संबंधाने निवेदन देण्यात आले. तेव्हा लवकरच कॅबिनेट बैठकीत जी आर काढण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणार असल्याचे मान्य केले आहे .मोर्च्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो आशा वर्कर गट प्रवर्तक व शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.मोर्चाला पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता, महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा 9850835306 चंद्रपूर जिल्हा मध्ये नवीन प्रतिनिधी नेमने आहे चंद्रपूर जिल्ह्याचे काम चव्हाण प्रतिनिधी पहात आहे याच्याशी संपर्क साधावा मो नंबर 9527249856
Popular posts from this blog