Skip to main content
म्हाळूंगे चाकण येथील बॅटरी दुकानातुन 2 लाख रुपये किंमतीची बॅटरी चोरीला.................म्हाळूंगे ,चाकण ( प्रतिनिधी स्वप्निल गायकवाड):-खिडकीची जाळी काढून शॉपमधून 2 लाख रुपयांच्या 32 बॅटरी चोरून नेल्या आहेत. ही चोरी 8 ते 9 जानेवारी रोजी महाळुंगे येथे सुर्या बॅटरी सेल्स अँड सर्व्हीस येथे घडली आहे.याप्रकरणी मुकेश बबन आगवणे (वय 39 रा.चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शॉपच्या मागील बाजूच्या भींतीची खिडकीची जाळी तोडून चोरांनी शॉपमध्ये प्रवेश केला. त्यांनी वेगवगेळ्या कंपनीच्या 2 लाख 135 रुपयांच्या 32 बॅटरी चोरून नेल्या आहेत. चोरीचा प्रकार उघडकीस येताच फिर्यादी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत माय भुमि न्युज. मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा
Popular posts from this blog