Skip to main content
लोणावळ्यात रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा वाहनांची धडक बसून मृत्यू................लोणावळा (प्रतिनिधी स्वप्निल गायकवाड ): येथील नारायणी धाम पोलीस चौकीसमोर मुंबई पुणे महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्षय शंकर सातकर (वय 28 वर्षे, रा जुना कामशेत, ता मावळ जि पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार मृत अक्षय शंकर सातकर हा तरुण लोणावळा शहरातील कैवल्यधाम याठिकाणी आचारी म्हणून कामाला आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कामावर जात असताना त्याला हा अपघात झाला. नारायण धाम पोलीस चौकी समोरील वळणावर अक्षय रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला तसेच डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.कलम 304 (अ), 279, 337, 338 मो.वा.का.क 184, 134/177 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढिल तपास स.पो.नि. पोवार हे करीत आहे. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा.,..... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा 9850835306
Popular posts from this blog