Skip to main content
*आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन सहमंत्री पदी श्री, सुनिल राठोड यांची*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण चंद्रपूर -आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन सहमंत्री पदी आज सुनिल राठोड यांची नियुक्ती करण्यात आली, सुनिल राठोड यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत व जिल्ह्यातील त्यांचे संघटन कौशल्य, नेर्तृत्व क्षमता, व त्याची कार्यकर्त्यावरील पकड व कामाचा सपाटा बघून शीर्ष नेतृत्वानी सुनिल राठोड यांची थेट जिल्हा संघटन सहमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली मागील दोन ते तिन वर्षात सुनिल राठोड यांनी जिल्यात पक्ष वाढी करिता खूप मेहनत घेतली असून शेकडो नवीन लोकांचा पक्ष्यात प्रवेश करून घेतला तसेच त्याची जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मजबूत पकड असून सर्वच तालुक्यात पार्टी मजबूत करण्यात व गावागावात आम आदमी पार्टी ची विचारधारा पोहचविण्यात यश प्राप्त झाले आहे. सुनिल भाऊ राठोड हे सामाजिक कामात सुद्धा अग्रेसर असुन मागच्या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीत जिवती तालुक्यातुन 35 संरपंच सदस्य आणले आहे व स्वत सोरेकसा ग्रामपंचायत सदस्य असून उत्तम समाजसेवक सुद्धा आहे पुरोगामी विचार धारेवर चालणारे असून स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत एक परिचित नाव आहे.. पार्टीने दिलेल्या नवीन जबाबदारी बद्दल त्यांनी सर्व प्रथम पार्टीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले व श्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेवर पार्टीचे नाव व विचारधारा चंद्रपूर जिल्यातील समस्त गावागावात पोहचविण्याचे प्रण घेऊ डबल जोमाने काम करू असे सांगितले पार्टीने दिलेल्या जबाबदारीला पूर्ण इमानदारीने व मेहनतीने पूर्ण करणार असे आश्वासन देणारे सुनिल भाऊ राठोड हे ग्रामिण भाग म्हणून ओळखल्याजाणाऱ्यां जिवती तालुक्याचे नाव लौकिक केले आहे व भ्रष्टाचार मुक्त तालुका करण्याचे आश्वासन दिले आहे ....... प्रतिनिधी kurshna chawan चंद्रपूर....... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा 9850835306
Popular posts from this blog