Skip to main content
लोणावळ्यात ओम फिटनेस क्लबचे नामदार आदित्य ठाकरेंच्या यांच्या हस्ते उद्घाटन.................लोणावळा (प्रतिनिधी स्वप्निल गायकवाड ): आजकालच्या तरुण तरुणींचा ओढा हा व्यायामाकडे, स्वतःच्या तंदुरुस्तीकडे जास्त आहे. ज्या समाजात शाळा आणि व्यायामशाळा या दोन शाळा चांगल्या असतील तर तो समाज मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्टया तंदुरुस्त राहतो असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केले. लोणावळा शहरातील ओम फिटनेस क्लबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.ओम फिटनेस क्लब ही लोणावळा शहरातील 7500 हजार चौरस फूट एवढ्या जागेत सुरू करण्यात आलेली एक अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी सुसज्ज अशी व्यायामशाळा आहे. या जिम मध्ये व्यायामशाळा, झुंबा, कराटे, डान्स क्लास आदी सुरू करण्यात आले आहे. या जिमच्या उदघाटनासाठी आदित्य ठाकरे हे लोणावळ्यात आले होते. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार सचिन अहिर, गौतम चाबुकस्वार, संजोग वाघिरे, जिमचे मालक शिरवली गावचे सरपंच बंडूभाऊ फाटक, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नंदुभाऊ फाटक, ओमकार फाटक, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक माजी नगरसेविका शादान चौधरी, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मंजुश्री वाघ यांच्यासोबतच शहरातील आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात गढूळ वातावरण तयार झाले असून राजकारणाची पातळी खलावली असल्याचं सांगितलं. आताच सरकार हे घटनाबाह्य सरकार असून ते सत्तेवर कब्जा करून बसले असल्याचा आरोप केला. लोणावळा शहरात मात्र एकही नगरसेवक, नेता, कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही, यातून पक्षाबद्दलची निष्ठा, ताकत आणि जिद्द दिसून आल्याचं ठाकरे पुढे म्हणाले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज 9850835306
Popular posts from this blog