Skip to main content
*केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत केकेझरी शाळा अव्वल*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती -येल्लापुर केंद्रा च्या नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकेझरी येथे घेण्यात आल्या .येल्लापुर केंद्राचे केंद्र प्रमुख शेंडे सर .,शेळकी सर ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा रजनी ताई मोरे , शाळेच्या मुख्याध्यापिका विद्दे मॅडम यांनी प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला .त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या .स्पर्धे नंतर मुलांनी आणि शिक्षकांनी भोजनाचा आस्वाद घेतला .स्पर्धा संपल्या नंतर नवरत्न स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला .माध्यमिक गटात केके झरी शाळे ने 9 पैकी 8 स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तर एका स्पर्धेत द्वितिय क्रमांक आला . प्राथमिक गटात : 9 पैकी 3 स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि 4 स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला .माध्यमिक गट :कथाकथन स्पर्धा :आशिष आडे प्रथम क्रमांक स्वयंस्फूर्त भाषण :आशिष आडे प्रथम क्रमांक वादविवाद :श्रेया भालेराव प्रथम क्रमांकएकपात्री भूमिका :वैष्णवी आडे प्रथम क्रमांक बुद्धिमापन स्पर्धा :वैष्णवी आडे प्रथम क्रमांक सुंदर हस्ताक्षर :सूचना काकडे प्रथम क्रमांक चित्रकला ;प्रितम भालेराव प्रथम क्रमांक स्वयंस्फूर्त लेखन :प्रितम भालेराव प्रथम क्रमांक स्मरण शक्ती :श्रेया भालेराव प्रथम क्रमांक प्राथमिक गट :_____कथाकथन स्पर्धा :खुशी गोरे द्वितीय क्रमांक स्वयंस्फूर्त भाषण :पारस मोरे प्रथम क्रमांक वादविवाद स्पर्धा : पारस मोरे प्रथम क्रमांक एकपात्री भूमिका :यश शिंदे द्वितिय क्रमांक सुंदर हस्ताक्षर : वेदिका वाघमारे द्वितिय क्रमांक चित्रकला स्पर्धा :गोविंद भालेराव प्रथम क्रमांक स्मरणशक्ती :खुशी गोरे द्वितीय क्रमांक हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज.... जाहिराती साठी नंबर 9850835306
Popular posts from this blog