Skip to main content
आ. सुभाष धोटेंच्या हस्ते जिवती तालुक्यात विविध विकासकामांचे भुमिपुजन. विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांशी संवाद : लबोरीचे सरपंच मोतीराम सिडाम व अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती :-- जिवती तालुक्यातील मौजा धोंडा अर्जुनी, लेंडीगुडा, कोलामगुडा, कुंभेझरी येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर विविध विकासकामांचे भुमिपुजन त्यांच्याच हस्ते पार पडले. यात धोंडा अर्जुनी येथे जन सुविधा योजना सन २०२२ - २०२३ अंतर्गत ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करणे, अंदाजे किंमत २० लक्ष आणि ग्रामपंचायत कुंभेझरी अंतर्गत लेंडीगुडा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र - १ आमदार विकास सन २०२३ - २०२४ निधी अंतर्गत समाज भवनाचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १० लक्ष, मौजा कोलामगुडा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग च्या आमदार विकास निधी अंतर्गत पांदन रस्त्याचे बांधकाम करणे अंदाजे किंमत ७ लक्ष, मौजा कुंभेझरी येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग च्या आमदार विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १० लक्ष रुपये निधीच्या विकासकामाचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. तसेच यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे महाविद्यालय, कुंभेझरी येथे भेट देऊन विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधला. तर नारपठार येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी लबोरी ग्रामपंचायतचे सरपंच मोतीराम सिडाम, ग्रा प सदस्य भारत शेडके, विठ्ठल कदम, नागनाथ कोरपल्लेवार, पिराजी इंगळे, मोहन चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेसचे दुप्पटे देऊन सर्वांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. अभिनंदन केले. या प्रसंगी जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सभापती सुग्रीव गोतावडे, अशपाक शेख, गटविकास अधिकारी रेजीवाड, धोंडा अर्जुनी ग्रामपंचायत च्या सरपंचा रंजना जुमनाके, उपसरपंच समशुद्दीन शेख, तमुस अध्यक्ष नामदेव चव्हाण, ताजुद्दीन शेख, कपिल राठोड, कुंभेझरी चे सरपंच कमला जाधव, उपसरपंच लहु गोतावडे, ग्रामविकास अधिकारी शेरकी, जि. प. बांधकाम विभाग अभियंता उरकुडे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा.... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा 9850835306 ..... प्रतिनिधी kurshna chawan चंद्रपूर
Popular posts from this blog