Skip to main content
आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित ..............आळंदी (प्रतिनिधी स्वप्निल गायकवाड):- इंद्रायणी वाचवा ! पवित्र इंद्रायणी नदीला धार्मिक दृष्ट्या महत्त्व आहे तर किर्तनकार प्रवचनकार तिचे उघडे स्वरूप डोळ्यासमोर कसे पाहु शकतात . या मागे अनेक आंदोलने झाली असून तरीही इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण झाले नसल्याचे विदारक सत्य अजून ही पहावयास मिळते तिचे गटार गंगेचे स्वरूप डोळ्यासमोर येताना दिसत आहे सर्वत्र दुर्गंधीमुळे ग्रामस्थ व भाविक हैराण झाले आहेत पाण्याला फेस येत असुन सर्व गटारे नाल्याचे सांडपाणी त्यात सोडले जात असल्याची शंका स्थानिक नागरिकांनी केली आहे तिला मृत स्वरूप आल्याने नदी परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीमुळे नको नकोसे होते. नगरपरिषद व स्थानिक लोकनेते म्हणावर्यांनी देखील डोळेझाक केली आहे प्रदूषण करणारे हे आपलेच आहे त्यामुळे ही डोळेझाक होत असावी. इंद्रायणी काठी! देवाची आळंदी लागली समाधी !ज्ञानेशाची अशी महती असणार्या गंगेच्या पाण्यात वाहून येणाऱ्या घाणीला कधी पायबंद लागेल हे देव जाणे सरकारी अधिकारी व नेते दुर्लक्ष करत असल्याने हे दिवस इंद्रायणी नदी प्रदूषित होण्यासाठी कारणीभूत आहे याला नागरिक ही तेवढेच जबाबदार आहेत कधी या नदीला पुन्हा तिचे मुळ स्वरूप येईल सांगता येत नाही तरीही सरकारने व स्थानिक स्वराज्य संस्थानी लक्ष घालून लवकरात लवकर या वर तोडगा काढावा अशी मागणी भाविक भक्तांनी व सुज्ञ निसर्ग प्रेमी करीत आहेत महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा 9850835306. माय भुमि न्युज
Popular posts from this blog