Skip to main content
*ॲड शहज़ादउल्ला खान यांच्या नेतूत्वात विद्यार्थी व पालकांचे आंदोलन*बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा बु येथे शिक्षकांच्या रिक्त पद व शाळेच्या नवीन इमारत बांधकाम संदर्भात विद्यार्थी व पालकांनी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष विधी सेल ॲड शहज़ादउल्ला खान यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बुलडाणा यांना निवेदन सादर करुन शाळा भरो आंदोलन करणार असल्याचे सुचवले होते त्या अनुषंगाने आज सकाळी विद्यार्थी व पालक वर्ग व युवा सहकार्यां सह ॲड शहज़ादउल्ला खान यांनी जि.प.उर्दु उच्च प्राथमिक शाळा लाखनवाडा येथे जमा होऊन घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले व तिथुन जि.प.कार्यालय बुलडाणा येथे जाण्यासाठी निघत असताना प्रशासना तर्फे शिक्षण अधिकारी खरात साहेब , गटशिक्षणाधिकारी गायकवाड साहेब व केंद्र प्रमुख धुरंधर सर व इतर कर्मचार्यांनी भेट दिली व आंदोलनकर्त्या सोबत चर्चा करून मागण्या मान्य करत तात्काळ शिक्षकांची पूर्तता केली व नवीन इमारत बांधकाम संदर्भात निर्देश दिले. या वेळी सज्जाद उल्ला खान , सुफयान उल्ला खान, डॉ तौसीफ , इद्रिस खान , अ.रहिम , अनसार खान , आनंद वानखडे, रज़ाउल्ला खान , खंडु पांढरे , शेख सलीम, मो जुनेद , मुसा रिज़वी , शेख आसीफ , आदिल खान मो शोएब, शारीक खान , साकीब , सदाकतउल्ला खान , करणं वानखडे , फैजान खान , प्रशीक वानखडे , आनंद वानखडे, अक्षय वाकोडे , जफर खान , साकीब खान व इतर पालक व गावकरी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा....माय भुमि न्युज...9850835306
Popular posts from this blog