Skip to main content
*अंगणवाडी सेविकेंच्या बेमुदत संपाला विराआस व जय विदर्भ पार्टीचा जाहीर पाठिंबा*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण चंद्रपूर -राज्यभर चालू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटना व मदतनीस यांच्या बेमुदत संपाला आज जय विदर्भ पार्टीचे नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुख सुदामभाऊ राठोड यांनी जाहीर पाठिंबा दर्शवीला अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या रास्त आहेत व या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे म्हणून सुदामभाऊ राठोड यांनी जिवती येथे अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाच्या ठिकाणी येऊन त्यांना पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला यावेळी उपस्थित ऍड. दीपक चटप, विशाल राठोड, नामदेव राठोड व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माय भुमि न्युज मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा
Popular posts from this blog