Skip to main content
*मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या सूचनेनुसार माजी उपसभापती श्री.महेशजी देवकते यांची पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रला भेट.**इमारत बांधण्यासाठी वन विभागांकडून जागा उपलब्ध होणार*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती : जिवती तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही अत्यंत खराब होऊन मोडकळीस आलेली होती, त्या इमारती रुग्णाला सेवा देण्यासाठी तिथे चांगली जागा राहिली नाही. इमारत मोडकळीस आलेली आहे पावसाळ्यात इमारत गळत असते, त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा रूग्णाची तपासणी करता येत नव्हती. अशा परिस्थिती मध्ये रूग्णाची सेवा करणे फार कठीण होते.त्याचा विचार करून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही निर्लेखन करण्यात आली होती. ती निर्लेखन झाल्यामुळे इथे नवीन इमारत होणे गरजेचे होते. याची दखल घेत जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. महेश बळीराम देवकते यांनी सतत मा.ना. श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने ,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर केद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ.भारतीताई पवार यांच्या कडून मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करून घेतला, त्यामुळे मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महेश देवकते यांना सूचना केली. इमारत आपण मंजूर केली; पण इमारत चांगल्या जागी आणि सुसज्ज झाली पाहिजे. त्यासाठी जागा कमी पडत असेल; तर जागा कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा.त्यामुळे पाहणी केली असता पाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेली वन विभागाची जागा PHC साठी मागणी करायचा निर्णय घेण्यात आला.त्यावेळी जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.महेश देवकते, डॉ.सौ शेडमाके मॅडम, बांधकाम विभागचे अभियंता श्री.राठोड साहेब, पाटण येथील सरपंच श्री. सीताराम मडावी, माजी उपसरपंच श्री.भीमराव पवार, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अंजनाताई भिमराव पवार, सामाजिक कार्येकर्ते श्री. विठल ता. चव्हाण, युवा कार्यकर्ते विश्वनाथ देवकते आदींची प्रामुख्याने उपस्थित होती महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा 9850835306
Popular posts from this blog