Skip to main content
**जिल्हा प्रतीनिधी अमोल देशमुख*पोलीस स्टेशन नांदुराआज दिनांक 11/02/2024 रोजी सकाळी 11/10 ते 11/30 वा दरम्यानपोलीस स्टेशन नांदुरा येथे मा पोलीस निरीक्षक सा. यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात पोलीस नांदुरा हद्दीतील डीजे वादक,डीजे मालक यांची आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखे नुसार) निमित्य मीटिंग घेण्यात आली. मीटिंग दरम्यान डीजे वाजवणाऱ्यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.1. डीजे चा आवाज शासनाने निर्देशित केलेल्या डेसिबल नुसार ठेवावा.2. शाळा कॉलेजेस हॉस्पिटल इतर धार्मिक ठिकाणी डीजे चा आवाज कमी ठेवावा.3. ज्या वाहनावर डीजे लावण्यात आलेला आहे वाहनांचे कागदपत्रे चालकाचे लायसन्स इतर सर्व गोष्टी अद्यावत ठेवाव्यात.4. पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता कुठल्याच प्रकारचे वाद्य वाजवण्यात येऊ नये.5. लग्न किंवा इतर मिरवणुकीमध्ये डीजे वाजवत असताना आपल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी वेळेचे बंधन पाळावे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही.तसेच इतर महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या मीटिंग दरम्यान दहा ते बारा डीजे चालक-मालक हजर होते करिता माहिती सादर महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा,माय भुमि न्युज.....9850835306
Popular posts from this blog