Skip to main content
*पालकमंञी ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंञी ना.श्री.अतुल सावे यांचेकडे केली घरकुलची निधी मंजूर करण्याची मागणी.*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतंर्गत व अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतंर्गत गरजू लोकांना घरकुल मिळावे यासाठी सन 2022-23 व सन 2023-24 या वित्तीय वर्षामध्ये आकांक्षीत जिवती व सावली तालुक्यातील तालुक्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल वसाहत योजनेतून 1024 घरकुल व पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतून आकांक्षीत जिवती तालुक्यातील एकूण 148 घरकुलांना जिल्हा निवड समितीने प्रशासकीय मंजूरी दिली आहे व सदर प्रस्ताव संबंधित मंञालयाचे विभागात सादर केले असून, दोनही योजनेतून जिल्हा निवड समितीने प्रशासकीय मंजूरी दिलेल्या घरकुल लाभार्थी यांना निधी मंजूर व्हावा यासाठी मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विभागाचे मंञी ना.श्री.अतुल सावे यांचेकडे मागणी केली असता, सदर घरकुलांना मा.ना श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शिफारशीने लवकर निधी मंजूर होणार असल्याचे जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजयुमो चे जिल्हा महामंञी श्री.महेश देवकते यांचेकडून समजली आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा..... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा....9850835306 माय भुमि न्युज प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर.....
Popular posts from this blog