Skip to main content
*युवाशक्ती ग्रामविकास संगठनची जिल्हा स्तरीय आढावा बैठक चंद्रपूर येथील विश्राम गृह येथे संपन्न*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , कृष्णा चव्हाण चंद्रपूर :- युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्य, 8 फेब्रुवारी 2024 दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर विश्रामगृह चंद्रपूर येथे संगठनचे संस्थापक/अध्यक्ष मा श्री इमरान पठाण सर व सचिव श्री पुरुषोत्तम सदार सर यांची चंद्रपूर जिल्हा येथे धावती भेट देण्यात आली. मान्यवरांचा चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी कडून सत्कार करण्यात आला.ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा पाया ग्रामपंचायत आहे आणि ग्रामविकास घडवून आणण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर घडत असलेल्या भ्रष्टाचाराविरूध्द सर्वसामान्य नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून कसे जागृत करायचे व ग्रामविकासाची चळवळ कशाप्रकारे उभी करायची याविषयी श्री इमरान पठाण सर इतर सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगठनचे संस्थापक/अध्यक्ष श्री इमरान पठाण सर तर मार्गदर्शक म्हणून श्री पुरुषोत्तम सदार सर व चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ मुऱ्हेकर, माहिती अधिकार कार्यकर्ता व यु. ग्राम. सं. जिल्हा सचिव चंद्रपूर जिल्हा पंचशील वाळके, युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे सदस्य समीर सावसाकडे, सामाजिक कार्यकर्ते विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते सुदाम राठोड, ग्राहक उपभोक्ता सौरक्षण समिती अध्यक्ष संतोष पारखी सर , विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अध्यक्ष किशोरभाऊ दहेकर, सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ ऐसेकर, कोरपना एक्सप्रेस साप्ताहिक संपादक मोहब्बत खान, युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे सदस्य दीपकभाऊ बेरशेट्टीवार, ॲड. तब्बसूम शेख, युवा सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा वाळके हिने जिजाऊ वंदना गाऊन सावित्री जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर याना मान्यवरांच्या हाताने दीपप्रज्वलन करून सत्कार कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे प्रास्तविक योगेश भाऊ मुऱ्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा वाळके व आभार सिकंदर सागोरे यांनी मानले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा, मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा 9850835306 माय भुमि न्युज
Popular posts from this blog