Skip to main content
*अवैध दारूच्या विरोधात दंपुर मोहदा येथे महिला एकवटल्या*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती - तालुका हा अती दुर्गम भागात व्यापलेला आहे.डोंगराळ भागात मोह फुलाची दारू काढून चोरून विक्री करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.त्यात दम्पुर मोहदा या गावात गावटी दारू सह देशी विदेशी दारू देखील चोरून विक्री केली जात आहे.त्यामुळे गावात लहान मुले व्यसनाच्या विळख्यातून अडकून पडले आहेत.गावात सायंकाळी झगडे भांडणे होणे,देऊ पिऊन कौटुंबिक कलह निर्माण होतात.त्यामुळे त्रस्त महिलांनी ग्राम सभेत दारू बंदीचा ठराव घेतला.गावात दारू बंद करण्यासाठी महिला पुढे आल्या आहेत. दारू विक्री करणाऱ्यांच्या पोलिस अधिकारी यांनी सहकार्य करून दारू बंद करण्यास सहकार्य करण्याचे यावेळी महिलांनी अपेक्षा व्यक्त केली महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा,माय भुमि न्युज....9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog