Skip to main content
भिवंडी येथील संकेत भोसलेंच्या मारेकरी यांचेवर कठोर कारवाई करा - भाई वैभव वानखडे अध्यक्ष- युवा भिम सेना""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""नांदुरा प्रतिनिधी:-- भिवंडी येथील दलित तरुण संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी नांदुरा तहसीलदार यांना युवा भिमसेनेच्या वतीने आज दिनांक २६/२/२०२४रोजी निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २२/२/२०२४ रोजी पंधरा ते विस गुंडांनी भिवंडी येथील दलित तरुण संकेत भोसले या अल्पवयीन तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता त्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात भरती करण्यात आले परंतु बेदम मार असल्यामुळे तो उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला त्याच्या मारेकरी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे तसेच त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे निवेदनावर भाई वैभव वानखडे संस्थापक अध्यक्ष युवा भिम सेना, अशांत रणित जिल्हा अध्यक्ष, संघराज वाघ, कुलदीप इंगळे, जितू इंगळे, निशांत इंगळे, सुरज इंगळे, युवराज रणित, विकास वाकोडे, नरेश मोजपुरे, आदींच्या सह्या आहेत महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर....9850835306
Popular posts from this blog