Skip to main content
*किसान सभा - संयुक्त किसान मोर्चा - केंद्रीय कामगार संघटना - SFI कडून SDO कार्यालयावर निदर्शने.* राजधानी दिल्ली मध्ये सुरू असलेल्या किसान आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेल्या दडपशाही मुळे किसान सभा व किसान मोर्चाने देशव्यापी ग्रामीण भारत बंद जाहीर केले आहे.२०१९ मध्ये शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं सरकार ने अजून ही पूर्णत्वास न आणल्याने किसान सभा व किसान मोर्चा ने केंद्रीय राजधानीत देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. परंतु सरकार चा त्यावर सकारात्मक प्रतिसाद नाही. उलट शेतकऱ्यांवर दडपशाही चा वापर केल्या जात आहे. या व इतर शेतकऱ्यांच्या समस्यांना अनुसरून आज SDO कार्यालय खामगाव येथे निदर्शने झालीत. व मा.तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये अखिल भारतीय किसान सभा शेतकरी व कामगार संघटनेचे कॉ. जितेंद्र चोपडे,कॉ. विप्लव कविश्वर,कॉ. रामचंद्र भारसाकळे,कॉ.धीरज विश्वकर्मा,कॉ. प्रकाश पताळे,कॉ बळीराम वेलोकार,कॉ. महेश वाकदकर,कॉ.वसंता चोपडे, आयु प्रकाश दांडगे,सुनिल तायडे, कॉ.सी एन देशमुख,कॉ. एस ए जाधव,कॉ.एन वाय देशमुख,कॉ शैलेंद्र तायडे,कॉ. संतोष गावंडे,कॉ. गोवर्धन रावणकार,कॉ. संगीताताई काळणे,कॉ. संध्याताई पाटील,कॉ.रोजा बाठे,संजय कोळी,देवेंद्र पल्हाडे, प्रल्हाद उन्हाळे,मुकेश वाकदकर, कॉ संजय वाघमारे. तसेच SFI कडून कॉ.रितेश चोपडे, कॉ.विजय उमाळे,सूरज बेलोकार,सूरज इंगळे,राजरत्न हिवराळे,सार्थक मुकुंद,शेख मोईन,अमित यादव,कैलास फाटे, व इतर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा..... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा. 9850835306.....माय भुमि न्युज
Popular posts from this blog