Skip to main content
बेकिंग.........माय भुमि न्युज बुलढाणा चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या कामगार संघटना व वाहतुक संघटनेच्या विविधपदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती!**कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या हस्ते नियुक्ति पत्र वाटप* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण *चंद्रपुर :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांच्या आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी VIP गेस्ट हॉऊस, चांदा क्लब ग्राउंड जवळ, चंद्रपुर येथे आज दि. 23 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारला दु. 12 वा. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे कामगार वर्ग व वाहतूकीची फार मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने शिवसेना भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी कामगार संघटनेचा विस्तार करण्याच्या आदेशानुसार कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्षपदी (वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र) अश्विन हेमके यांची तर भद्रावती शहर अध्यक्षपदी विकास मडावी यांची नियुक्ती करण्यात आली.**तसेच शिवसेना भारतीय वाहतुक संघटनेचे, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांनी वाहतुक संघटनेच्या चंद्रपुर तालुका अध्यक्षपदी सुरेश खापर्डे, चंद्रपुर तालुका उपाध्यक्षपदी विश्वास शेंडे, चंद्रपुर अध्यक्षपदी जितेंद्र भोयर व भद्रावती शहर अध्यक्ष मनोहर पतरंगे यांची नियुक्ति करुन सर्व मिळून वाहतुक व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याच्या सुचना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी देवून नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.**सदर शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या कार्यक्रमाला शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख (राजुरा, चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र) बंडूभाऊ हजारे, उप जिल्हाप्रमुख कमलेशभाऊ शुक्ला, शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हा प्रमुख (बल्लारपुर, चिमूर व वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र) मिनलताई आत्राम, चंद्रपुर उप तालुका प्रमुख अविनाश ऊके, भद्रावती शहर प्रमुख पप्पूभाऊ सरवन, राजुरा शहर प्रमुख खुशालभाऊ सूर्यवंशी, भद्रावती माजी तालुका प्रमुख नरेशभाऊ काळे, नगरसेवक नानाभाऊ दुर्गे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर.....9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog