Skip to main content
*नागपुरातील नमो युवा महासम्मेलनात चंद्रपूर जिल्हयातून बातमी...माय भुमि न्युज वर हजारो युवकांची हजेरी*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती: -नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचे नमो महा मेळावा दिनांक 04 मार्च, 2024 रोजी पार पडले. भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंञी श्री.सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री.हंसराज अहिर यांचे मार्गदर्शनानूसार चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुक्यातून व चंद्रपूर शहरातून हजारो युवक नमो महासम्मेलनात हजेरी लावली. या युवा महासम्मेलनात भाजपच्या वरिष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्विनी सूर्याजी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर, यांनी मार्गदर्शन केले.सदर युवा संम्मेलन करीता युवकांची उपस्थिती रहावी यासाठी सर्व जबाबदारी भाजयुमो चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेश देवकते व चंद्रपूर महानगरची जबाबदारी भाजयुमो.चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष विशाल निंबाळकर यांना देण्यात आली होती.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके आणि डोल ताष्या च्या गजरामध्ये रॅलीला हिरवी झेडी भाजपा चे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा,यांनी दाखवून रॅली काढण्यात आली.त्यावेळी महामंत्री ब्रिजभूषण पाझरे, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे , माजी महापौर सौ.राखीताई कांचालावर आदी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog