Skip to main content
बेकिंग....... माय भुमि न्युज वर शहिद विर जवानांना एकनिष्ठा फाउंडेशननी रक्तदान करून दिली श्रद्धांजली**दिनांक 21मार्च 2024*खामगांव :- गौ - सेवा रक्तसेवा मध्ये सदैव तत्पर असणाऱ्या एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही सुद्धा *शहीद दिवस* निमित्त स्थानिक सामान्य रुग्णालय, खामगाव येथे *एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाऊंडेशन* तर्फे गरजू गरीब रुग्णांसाठी शासकीय रक्तपेढी मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि. 19 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उदघाट्न कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेशजी पारीक यांच्या हस्ते करण्यात आले. येथील शासकीय रक्तपेढी मध्ये रक्ताचा भयंकर तुटवडा असल्याने रुग्णांना रक्तासाठी वन वन भटकावे लागत होते या सर्व गोष्टीची दखल घेत 23 मार्च शहीद दिनाचे औचित्य साधून रक्तदान करून रक्तदात्यांनी सर्व शहिदांना श्रद्धांजली दिली...शिबिराचे आयोजन एकनिष्ठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी सर्व रक्तविरांना योग्य मोलाचं मार्गदर्शन केले. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा डॉ. निलेश टापरे, रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख यांनी शासकीय रक्तपेढी मध्ये वेळोवेळी रक्तदाते एकनिष्ठा फाउंडेशन करून पुरविण्यात येते असे प्रतिपादन करून कौतुक केले. या शिबिरात अमोल नारखेडे सर, ज्ञानेश सेवक सर, जितेंद्र मच्छरे, हिंदुराष्ट्र सेनेचे रवी माळवंदे, निलेश राऊत, अनिल चव्हाण, सौ. संगीता देशमुख मॅम, लखन सारसर,पुरषोत्तम हरमकार, आनंदसिंग चव्हाण, निलेश भाटी, हर्षल खेडकर, जगमितसिंग सिद्धू, संजु शेजव, जगन कोंडे, संजय मात्रे, अजय निंबाळकर, धिरज मानकर, विशाल निमकर्डे, अनिकेत कोरडे,वैभव अवकाळे, संतोष चव्हाण, ऋषिकेश डवंगे, गोपाल गाढे, अनिकेत गलांडे, बंटी मोरे, आकाश सुरडकर, सुरज खंडारकर, अरविंद पडवाल, रमेश खैरे, रितेश गाढे, राजेंद्र खंडारे, नितीन जाधव, शेख अमन शेख रहेमान, मोहन तायडे, संदीप कळसकार, राहुल चव्हाण, अविनाश मच्छरे, दिपक चव्हाण व अजून तीन गोपनीय अश्या 43 रक्तदात्यांनी गरजू रुग्णांना रक्तदान करून शहीद विर जवानांना अमर रहे अमर रहे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अमर रहे जिते जी रक्तदान श्रेष्ठदानच्या घोषणा देत रक्तदात्यांनी हसत हसत रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम देशमुख महाराज, निता वर्मा मॅम, राजु तांबटकर, सागर बेटवाल, नागेश शिंगन, संजय मात्रे, डॉ. निशांत मुखीया, शिवम मानकर, गोपाल धोटे, अमोल टिकार, प्रदीप शम्मी, चेतन कदम, विक्की सारवान, गणेश मनसुटे, पंकज अंबारे आदि लोकांनी घेतले यावेळी शासकीय रक्तपेढीचे सौ. राजश्री सावके, सौ. सपना कांबळे,परिचारिका श्रीमती भारती काळे, कर्मचारी अंकुश राऊत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश सेवक यांनी केले तर आभार प्रदीप शम्मी यांनी मानले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर निर्मळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. सुरजभैय्या यादव यांनी रक्तदात्यांना धन्यवाद देऊन शिबिराचे समारोप केले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, सिद्धेश्वर निर्मळ खामगाव शहिद
Popular posts from this blog