Skip to main content
*प्रा.आ.केंद्र शेणगाव अंतर्गत अनेक गावामध्ये जनजागृती पर पत्रके वाटत व रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण बेकिंग.....,.... माय भुमि न्युज वर करत जागतिक क्षयरोग दिन साजरा*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती:-संपूर्ण जगात 24 मार्च हा दिवस आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करत असतो,ह्या दिवसाच्या निमित्ताने प्रा.आ.केंद्र शेणगाव अंतर्गत गावामध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली,गावात,आठवडी बाजारात,शाळेत,आरोग्य केंद्रात जनजागृती पर पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. 1882 मध्ये डॉ.रॉबर्ड कॉक शास्त्रज्ञ यांनी क्षयरोगाच्या जीवानूचा शोध लावला आणि त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञाच्या परिषदेत मांडला तेव्हापासून 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो डब्ल्यू.एच. ओ.नें 2030 पर्यंत संपूर्णनें जग क्षयरोग मुक्त करण्याचे लक्ष ठेवले आहे याचाच भाग म्हणून भारताने 2025 पर्यंत देशांना क्षयरोगापासून पूर्णपणे मुक्त करण्याचे लक्ष ठेवले आहे याचाच भाग म्हणून पाहता 2024 YES!WE CAN END TB हे ध्येय वाक्य ठेवून महाराष्ट्रातील पारंपरिक उत्सवांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती लवकर पोहचेल या उद्देशाने मागील वर्षी क्षयरोग निर्मूलनाची गुढी उभारून संदेश देण्यात आला होता याचे अनेक स्तरातुन कौतुकही झाले यावर्षी लोकांनी होळीच्या भोवती गोळा होऊन गावावर आलेले संकट,रोगराई दूर करण्यासाठी ग्रामदेवतेला साकड घालत होळीत सर्व वाईट गोष्टींचा नाश होऊ दे,असे बोलतो त्याचप्रमाणे उभारलेल्या प्रतिकात्मक होळीत क्षयरोगाचा नाश होऊन भारत क्षयरोग मुक्त होईल असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर होळीच्या सणात क्षयरोग होऊ नये किंवा झालाच तर त्यासाठी काय केले पाहिजे या संदर्भात जनजागृती करून या संदर्भात काय काळजी घेतली तर आपण लवकरच क्षयरोग मुक्त भारताच्या दिशेने पाऊल टाकू असा संदेश देत प्रा.आ.केंद्र शेणगाव अंतर्गत गावांमध्ये पत्रके वाटण्यात आली.व जागतिक क्षयरोग दिनाचे औचीत्य साधत रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित प्रा.आ.केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अबीद शेख,टीबी सुपरवायझर सचिन बरडे डॉ.विशाल पवार,डॉ.प्राजक्ता लांजेवार डॉ.अर्पित व्यवहारे,आरोग्य सेवक सुरेश खाडे,आरोग्य सहाय्यक प्रवीण खांडरे,आरोग्य केंद्रातील कर्मचारी सविता चौके,प्रियंका संगममवार,अशीष पटले गोविंद गोरे,आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog