Skip to main content
*जिवतीला अविनाश शेंबटवाड यांच्या सारखा कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला हे जिवती वासियांचे भाग्य :- गजानन पाटील जुमनाके**जिवती येथे तहसीलदार शेंबटवाड लिखित "जिवती द लास्ट पॅराडाईज" चित्रपट प्रदर्शित*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती :- हा आदिवासी बहुल भाग आहे, या भागात अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे, या भागात आदिवासी संस्कृती अतिशय लोकप्रिय आहे, त्या आदिवासी संस्कृतीला चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर ठेवण्याचे मोठं काम जिवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी केले, असा कर्तव्यदक्ष अधिकारी जिवतीला लाभला हे जिवती तालुका वासियांचे भाग्य आहे असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटिल जुमनाके यांनी केले.आज जिवती येथे तालुक्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी दिग्दर्शीत केलेल्या "जिवती द लास्ट पॅराडाईज" हा चित्रपट प्रदर्शित सोहळा पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने तहसीलदार शेंबटवाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिवती तालुका वासियांचे प्रलंबित जात प्रमाणपत्राची प्रकरणे मंजूर करून नागरिकांना जात प्रमाणपत्र व इतरही शासकीय कागदपत्रे वितरित करण्यात आल्याबद्दल आभारही व्यक्त केले.या वेळी जिवती नगरपंचायतीचे नगरसेवक ममताजी जाधव जमालुद्दीन शेख, क्रिष्णा सिडाम, नगरसेविका सतलूबाई जुमनाके, लक्ष्मीबाई जुमनाके, मूळनिवासी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, सोशल मीडिया संयोजक संकेत कुळमेथे, मंगेश पंधरे, अनिल आडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog