Skip to main content
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या बेकिंग.....माय भुमि न्युज...नियुक्त्या जाहीर----------------------------------------चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती :- आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) जिवती येथील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सुचनेनुसार विजय गोतावळे यांची जिवती तालुकाध्यक्षपदी तर अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष गफार निजाम शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बबलू राठोड, युवक काँग्रेस तालुका सचिव राम कोडपे अनु जाती जमाती तालुकाध्यक्ष वैजनाथ सूर्यवंशी अनु जाती जमाती तालुका उपाध्यक्ष गणेश बटवाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका सहसचिव नितीन पवार या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सचिव आबीद अली यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देउन निवड करण्यात आली.सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची विद्यमान स्थिती बिकट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रभर सर्वसामान्यांचे मुद्दे उचलत असतो व सर्व सामान्य, शेतकरी, युवकांना न्याय देण्याचा काम करतो तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक कार्यात व जनसामान्यात ओळखीचे असलेल्या लोकांना पक्षाची जबाबदारी दिली जात आहे.समाजकार्यात पुढे असणारे विजय गोतावळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) जिवती तालुकाध्यक्ष पदीनिवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर बोलताना विजय गोतावळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणुन काम करताना सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. नियुक्तीनंतर जिवती तालुक्यात निश्चितच पक्षसंघटन वाढीसाठी कटिबद्ध असून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल असे यावेळी सांगितले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर ९८५०८३५३०६ प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog