Skip to main content
*जय विदर्भ पार्टी तर्फे चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राचा बेकिंग....माय भुमि न्युज उमेदवार अशोक राठोड*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.चंद्रपूर -जय विदर्भ पार्टी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास कटीबद्ध असून त्याद्वारे शेतकरी आत्महत्या रोखणे, शेतीचा विकास, नागरिकांच्या उत्पनात वाढ, बेरोजगारी संपविणे, उद्योगाची स्थापना करणे राज्यातील जनतेला स्वस्त दरात वीज देणे, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, आरोग्याचा सुविधा उपलब्ध करून देणे एकूणच विदर्भातील सर्व जिल्ह्याचा जलद गतीने विकास करण्याचा उद्देश हाती घेऊन जय विदर्भ पार्टी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी चंद्रपूर येथे झालेल्याकार्यकर्ता बैठकीत दिली. यावेळी चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्रात जय विदर्भ पार्टीकडून अशोक रानाजी राठोड यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. सदर बैठकीला पक्षाचे जनरल सेक्रेटरी विष्णू आष्टीकर, पक्षाचे उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, कार्यकारिणी सदस्य सुदाम राठोड, अरुण मुणघाटे, मारोतराव बोथले, तात्यासाहेब मत्ते, रामराव चव्हाण, किशोर दहेकर, विशाल राठोड, भूषण चिलके, विकास चव्हाण व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog