Skip to main content
*राज्यात महिलांना सर्ववतोपरी सक्षम करण्याचे काम महायुती बातमी.......माय भुमि न्युज वर सरकारकडून झाले* - *डॉ. मनीषा कायंदे*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण मुंबई- आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महायुती सरकारने सर्व सरकारी कागदपत्रांवर संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. आगामी महाराष्ट्र दिनापासून राज्यात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात शिशुच्या जन्मदाखल्यावर आईचे नाव बंधनकारक असेल. शाळेतील प्रवेश प्रक्रिया अर्जापासून ते आधार कार्ड,पॅन कार्ड, रेशन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा सातबारा, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, बँक पासबुक ते मृत्यू दाखल्यापर्यंत सर्व कागदपत्रांवर संबंधिताच्या आईचे नाव अनिवार्य असेल. देशाच्या महिला धोरणाला अनुसरून महायुती सरकारने हा निर्णय घेतल्याची प्रशंसा शिवसेना सचिव डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. राज्यात महायुती सरकार येताच महिला सक्षमीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. मुलीच्या जन्मापासून तिच्या अस्तित्वाची ओळख होण्यासाठी सर्वतोपरी आवश्यक उपाययोजना महायुती सरकारने घडवून आणल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची जबाबदारी सांभाळल्यापासून महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होऊ लागला आहे. शिवसेनेचे नेतृत्व सांभाळत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यदेखील सुरळीतपणे सांभाळले, अशी माहिती शिवसेना सचिव व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी दिली. याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना सचिव डॉ. मनीषा कायंदे सांगतात," आपल्या घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी समाजकारणात आणि राजकारणात भरीव योगदान दिले आहे. इतरांना सामावून घेत सर्व कामे यश यशस्वीरित्या पूर्ण करण्याची किमया केवळ महिलांमध्ये असते. अनेक संकटांचा सामना करत महिला आपले अस्तित्व निर्माण करतात. स्त्रियांच्या कर्तुत्वाला हात देण्यासाठी महिला दिनानिमित्ताने अनेक पुरस्कारांचेही आयोजन होते. परंतु पुरस्कारांच्या पलीकडेही महिलांना सामाजिक स्तरावर सन्मान होणे बाकी होते. सर्व सरकारी कागदपत्रांवर संबंधित व्यक्तीच्या आईचे नाव नोंदी स्वरूपात बंधनकारक केल्याने महायुती सरकारने महिलांचा यथोचित सन्मान केला." माननीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात महिलांना संधी देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या नेतृत्वात महिला नेत्या महापौर,उपमहापौर, पालिकेत स्थायी समिती सदस्या आणि सभागृह नेत्या होऊ शकल्या. देशपातळीवर विधानसभा, लोकसभेतील चर्चा महिलांनी नेत्या गाजवत असताना सचिव पदापासून मात्र महिला दूर राहिल्या. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणात महिलांचे स्थान अबाधित रहावे यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य महिलांसाठी एसटीत ५० टक्के सवलत देऊ केली, लेक लाडकी योजना अंमलात आणली, बचत गटात गुंतवणूक वाढवली, अंगणवाडी आशाताई वर्कर्स च्या मानधनात वाढ केली, महिलांना शिक्षण आणि नोकरीसाठी वसतीगृह उभारणी ते तब्बल एक लाख नोकऱ्यांची निर्मिती हे केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य होत आहे, असेही शिवसेना सचिव डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog