Skip to main content
*जिवती येथे तालुकास्तरीय आरोग्य जनसंवाद संपन्न*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती -राष्ट्रीय आरोग्य अभियान, मातृ संस्था स्टापी पुणे व प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर द्वारा 'कम्युनिटी ॲक्शन फॉर हेल्थ' या कार्यक्रमांतर्गत जिवती येथे तालुकास्तरीय जनसंवादाचे आयोजन करण्यात आले. जनसंवादात हेमंत भिंगारदेवे गट विकास अधिकारी, डॉ.अविष्कार खंडारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.स्वप्निल टेंभे तालुका आरोग्य अधिकारी, बालाजी वाघ सी.ए.एच. प्रकल्प अधिकारी, निलेश देवतळे जिल्हा समन्वयक, वैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र अहिरकर, डॉ.कविता शर्मा, डॉ.आबीद शेख, अक्षय देशमुख जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक, गणेश चिंतकुटलावर फेल्लो आकांशीत तालुका कार्यक्रम, आरोग्य विस्तार अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, तालुका समन्वयक संभाजी ढगे, मंगला घटे, अरुणा खोब्रागडे, तालुक्यातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, आशा पर्यवेक्षिका, अं.सेविका, आशा वर्कर, ग्राम आरोग्य दूत, बचत गटातील महिला, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसंवादाचे प्रस्ताविक, प्रकल्पाची ओळख व भूमिका निलेश देवतळे यांनी केले, जनसंवाद कार्यक्रमाचे संचालन व पार्श्वभूमी अक्षय देशमुख यांनी मांडली तर डॉ. अविष्कार खंडारे यांनी जनसंवाद कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात घ्यायला पाहिजे जनसंवादातून बरेच प्रश्नाचे निराकरण होतात यामुळे नागरिकांना समाधान मिळते असे मनोगत व्यक्त केले. स्वप्निल टेंभे यांनी जनतेला आरोग्यविषयक प्रश्नांना सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे असे मत व्यक्त केले. बालाजी वाघ यांनी ग्रामसभा यशस्वी करून ग्रामस्थांनी आरोग्यविषयक निधीचे नियोजन करावे ज्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागू शकते असे मत व्यक्त केले. सदर जनसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांनी गावातील व तालुक्यातील आरोग्य, रोजगार, स्वच्छता, शिक्षण, बांधकाम, संदर्भ सेवा, रस्ते, पाणी, रिक्त पदे इत्यादी विविध विषयावरील प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमाचे आभार संभाजी ढगे यांनी मानले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog