Skip to main content
मी शरद पवार आहे माझा नाद करु नका - शरद पवार यांचा बातमी...... माय भुमि न्युज वर कार्यकर्ता मेळाव्यात सज्जड दम..............लोणावळा / प्रतिनिधी स्वप्निल गायकवाड : तुम्ही आमदार कोणामुळे झालात, तुमच्या निवडणूक अर्जावर अध्यक्ष म्हणून सही कोणी केली, तुमचा प्रचार कोणी केला, सभा कोणी घेतली, कार्यकर्त्यांना दम देण्यापूर्वी याचा विचार करा. मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका अशा शब्दात शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची कानउघाडणी करीत त्यांना एकप्रकारे सज्जड दम दिला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं लोणावळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शरद पवार हे बोलत होते. तत्पूर्वी माजी मंत्री मदन बाफना यांनी आपल्या भाषणात बोलताना आमदार सुनील शेळके हे कार्यकर्त्यांना दमदाटी करीत असल्याचे सांगत खुद्द मला देखील त्यांनी दम दिल्याचे शरद पवार यांच्यापुढे सांगितले. यावर शरद पवार यांनी आमदार शेळके यांचा समाचार घेतला. सोबतच बोलताना शरद पवार केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर टीका करताना म्हणाले, ज्या वेळेस मी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी पहिली फाईल समोर आली ती गहू आयातीची. मी सही केली नाही पण मी अस्वस्थ झालो. आपला कृषी प्रधान देश आहे आणि आपण गहू आयात करतो ही गोष्ट मला सतावत होती. त्यावर त्यावेळी निर्णय घेतले आणि आज आपला देश गहू, साखर यासारख्या क्षेत्रात जगात अग्रेसर असल्याचे आहे. मात्र आज मोदी सरकारच्या काळात देशात बळीराजाला आत्महत्या करण्याची परिस्थिती आली असल्याची टीका शरद पवार यांनी केली. याशिवाय आज रोज मोदी सरकारच्या ज्या जाहिरात येत आहे त्या जाहिरात कुठून येतात? त्या देखील जनतेच्या पैशातून येत आहे असे पवार म्हणाले.यावेळी माजी राज्यमंत्री मदनशेठ बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, माजी महापौर संजोग वाघिरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रमेशचंद्र नय्यर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, चंद्रकांत सातकर, कुमार धायगुडे, नंदकुमार वाळंज, नासीर शेख, यशवंत पायगुडे, विनोद होगले , अतुल राऊत,भारती शेवाळे, सुरेश चौधरी, दत्तात्रय गोसावी, फिरोज शेख, सुधीर कदम, श्वेता वर्तक , शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , शादान चौधरी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोणावळा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवाय तालुक्यातील व जिल्ह्यातील काही पदे देखील जाहीर करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच कॉग्रेसपक्षातुन राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केलेल्या नासीरभाई शेख यांच्याकडे लोणावळा शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली व युवक आघाडीचा अध्यक्षपदी अजिंक्य कुटे महिला आघाडीच्या श्वेता वर्तक यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306
Popular posts from this blog