Skip to main content
*चंद्रपूर बेकिंग........माय भुमि न्युज वर जिल्हा नवनियुक्त शिवसेना संपर्क प्रमुख किशोरजी रॉय यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात घेतली आढावा बैठक..!*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण *चंद्रपुर :- येथील हॉटेल सिद्धार्थ येथे दिनांक 31 मार्च 2024 रोज रविवारला दु. 2:00 वा. चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चंद्रपूर जिल्हा नवनियुक्त शिवसेना संपर्क प्रमुख किशोरजी रॉय यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी शिवसेनेचे नागपूर विभागीय कार्यालय सचिव प्रफुलजी मानमोळे, काटोल विधानसभा संघटक रितेश हेलोंडे पाटिल, नवनियुक्त जिल्हा संघटक युवराजजी धानोरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे नितीनजी मत्त्ते, महिला जिल्हाप्रमुख मीनलताई आत्राम, प्रतिभाताई ठाकूर, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद बूटले, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, महानगर प्रमुख भरत गुप्ता, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा प्रमुख तथा बल्लारपुर तालुका प्रमुख जमीलभाई शेख व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.**यावेळी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवडणुकीत निवडून आणन्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला. तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला जोमाला लागावे, असे निर्देश जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना संपर्कप्रमुख किशोरजी रॉय यांनी देवून मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांणी सुधीरभाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog