Skip to main content
*चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेनेची ताकद सुधीरभाऊ मुनगंटीवारांना विजयी करण्यासाठी लावणार! आ.मनीषा ताई कायंदे* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.चंद्रपुर :- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, शिवसेना सचिव संजयजी मोरे, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या आदेशाने व चंद्रपूर संपर्कप्रमुख किशोरजी यांच्या सूचनेनुसार दि. 3/4/2024 रोज बुधवारला दु. 2 वा. इम्पेरियल हॉल दाताळा येथे चंद्रपूर शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे तसेच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कांग्रेस (अ.प.), रिपाई (आ.) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विजयासाठी चंद्रपूर शिवसेनेतर्फे संकल्प करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना सचिव पूर्व विदर्भ महिला संघटक मनीषाताई कायंदे आमदार विधान परिषद सदस्या यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेनेची ताकद सुधीरभाऊ मुनगंटीवारांना विजयी करण्यासाठी लावणार असल्याचे सांगितले. युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षलजी शिंदे, नागपूर जिल्हाप्रमुख मनीषाताई पापडकर यांच्या उपस्थितीत मेळावा यशस्वी पार पाड़ण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हाप्रमुख नितीन मत्त्ते, जिल्हा संघटक युवराजजी धानोरकर, महिला जिल्हाप्रमुख मिनल आत्राम, महिला जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद बुटले चंद्रपुर तालुकाप्रमुख संतोषजी पारखी, महानगर प्रमुख भरतजी गुप्ता आणि सर्व विधानसभा उपजिल्हाप्रमुख विधानसभा संघटक तसेच जिल्ह्यातील तालुकाप्रमुखांनी व शिवसैनिकांनी व सर्व समस्त कार्यकर्त्यांनी कालच्या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. त्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog