Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज.....*गुरुकृपा माध्यमिक विद्यालय सावरखेड बु उज्वल यशाची परंपरा कायम*सावरखेड बु / प्रतिनिधी : गुरुकृपा माध्यमिक विद्यालय सावरखेड बु ता. चिखली या विद्यालयाची वर्ग दहावी शालांत परीक्षेच्या निकालामध्ये कायम नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये एकूण 46 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी 45 विद्यार्थी पास झाले शाळेचा एकूण निकाल *97.82%* असा उत्तुंग लागलेला आहे. सदर पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, प्रथम श्रेणीमध्ये 22 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये 04 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी गुरुकृपा विद्यालयाच्या उत्तुंग निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात गुरुकृपा माध्यमिक विद्यालयातून *सुरज विजय गायकवाड (90.60%)* या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला व *तेजस महादेव पांडे (90%)* या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय स्थानी *निखिल सदानंद दहातोंडे (88.20%)* या विद्यार्थ्याने बाजी मारली. या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव सुखदेव काळे सर, संस्थेचे युवा नेतृत्व रवीभाऊ काळे, मुख्याध्यापक रविंद्र सोळंकी सर, तथा शिक्षक श्री सरदारसिंग गोलाईत, श्री गजानन सोळंकी, श्री माधवराव बनकर, श्री रमेश इंगळे,शिक्षकेतर कर्मचारी श्री गजानन सोळंकी, श्री राजेंद्र तळेकर, श्री श्रीकांत दहातोंडे, श्री दिलीप चिंचोले यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog