Skip to main content
बेकिंग........ माय भुमि न्युज......*सेवादासनगर येथे वीज पडून तीन बैल ठार; शेतक-यांवर ओढवले संकट*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.कृष्णा चव्हाण *जिवती तालुक्याचे तहसिलदार श्री.अविनाश शेंबटवाड व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.हिरुडकर यांनी तात्काळ स्टाॅफला पंचनामा व p.m.अनूषंगाने निर्देश दिल्याचेही समजले.* *मृत्युमुखी पडलेल्या तीन बैलाचा शवविच्छेदन दि.23/05/2024 रोजी करण्यात येणार.**घटनास्थळी पोलीस व पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारीही पोहोचले.**जिवती:* तालुक्यात ठिक-ठिकाणी विजांच्या कडकडाट जोराच्या वा-याने अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी वादळी-वारा-पावसाचा फटका सेवादासनगर येथील तीन शेतक-यांना बसला आहे.मौजा: सेवादासनगर, ता.जिवती येथील शेतकरी वामन रेखुजी राठोड, संजय बाबू राठोड व बाबू रामा जाधव यांच्या प्रत्येकी एक बैलावर वीज कोसळून एकूण तीन बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक : 22/05/2024 चे सायंकाळी 05.30 वाजेच्या दरम्यान घडली. शेतकरी वामन राठोड, संजय राठोड व बाबू जाधव यांचे बैल गावातील कनिराम शिवाजी राठोड यांनी घरासमोर टाकलेल्या लाकडी मांडव्याखाली वादळी वारा पाऊस आल्याने आडोशा घेण्यास थांबले असता, मांडवा लगत असलेल्या सुबाभूळ झाडावर व तीनही बैलावर वीज पडल्याने नमूद शेतक-यांचे तीनही बैल जागीच ठार झाले. शेतकरी वामन राठोड यांनी गावात बैल फिरत असल्याने, बैल आणण्यास गावात गेले असता, बैलास घरी आणताना वादळी पाऊस वीजांच्या कडकडाटसह सुरु झाल्याने, रस्त्यावर असलेल्या भावाच्या घराच्या व्हरांड्यात आडोशाला उभे होते, त्यादरम्यान वीज कोसळून तीनही बैल जागेवरचं ठार झाले.मुलाबाळाप्रमाणे जपलेल्या बैलाचा स्वतःच्या डोळयादेखत वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने तीनही शेतक-यांवर संकट ओढवले आहे. वामन राठोड या शेतक-यांचे पंचावन्न हजार रुपये, संजय राठोड यांचे पन्नास हजार रुपये तर बाबू जाधव यांचे पंचेचाळीस हजार रुपयाचे असे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु असतानाचं बैल मृत्युमुखी पडल्याने शेतक-यांचा शोक अनावर झाला आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306..... प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog