Skip to main content
बेकिंग........ माय भुमि न्युज,*गट प्रवर्तक व आशा वर्कर तालुका मेळावा चिमूर येथे संपन्न. कंत्राटी कर्मचारी दर्जा व 10हजाार मोबदला वाढ .2 हजार दिवाळी बोनस निर्णय साठी 2 जुलै रोजी मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण चिमूर :- आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संलग्न आयटक चा तालुका स्तरीय मेळावा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यामध्ये विविध मागण्या बाबत चर्चा झाली ज्यामधे गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या प्रस्ताव त्वरित राज्य व केंद्र सरकारने मंजूर करावा. यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्य शासनाने गट प्रवर्तक ना १०हजार मोबदला वाढ .2 हजार रू.दिवाळी बोनस निर्णय चा शासन जी आर काढावा.अमलबजावणी करावी. गट प्रवर्तक व आशा वर्कर ला त्वरित सामाजिक सुरक्षा देऊन किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, प्रसूती पगारी रजा भविष्य निर्वाह निधी लागू करा. गट प्रवर्तक ना हजेरी साठी जीपिस सक्ती करु नये. राज्यातील कार्यरत गट प्रवर्तक चा एकत्रित हक्क लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सूरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात 2 जुलै 2024 रोजी मुंबई आझाद मैदान मध्ये गट प्रवर्तक कर्मचारी यांचा छत्री आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योग्य पद्धतीने न्यायालयीन लढा सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्याला आयटक नेते कॉ. विनोद झोडगे,तालुका अध्यक्ष कॉ.ममता भिमटे,विश्रांती रामटेके यांनी मार्गदर्शन केले यावेळी कॉ. वैशाली वाघमारे,रेखा शेडामे,हेमलता रामटेके, अर्पणा धनविजय,भानुशी कुरेशी,धनश्री येडणे उपस्थित होते. गट प्रवर्तक चे राज्य व केंद्र सरकार आर्थिक शोषण करित आहे. गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा मिळालाच पाहिजे व प्रत्येक योजना कर्मचारी ना किमान वेतन दीले पाहिजे. हया मागण्यासाठी आपल्या सोबत आहोत. आपले प्रश्न शासन कडे मांडण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन दिले कॉ. विनोद झोडगे यांनी दिले आहे यावेळी तालुक्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होत्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog