Skip to main content
*बेकिंग.........माय भुमि न्युज चंद्रपूर जिल्ह्यातील मराठा समाजाला तात्काळ जातीचे दाखले द्या शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांची जिल्हाधिकारी यांना मागणी*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती -महाराष्ट सरकारने मराठा समाजाकरिता 11 मार्च 2024 रोजी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाकरिता SEBC जीआर काढून संपूर्ण महाराष्ट्रात एसीबीसी अंतर्गत आरक्षण लागू केले त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला जातीचे दाखले व नॉन क्रिमिलेयर देण्यात येत आहेत परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील मराठा समाजाला जातीचे दाखले देण्यात येत नाहीत.चंद्रपूर जिल्ह्यातील अगदी टोवकर असलेला जिवती तालुका येथे मराठा समाज मोठ्या प्रमाणात राहतो पण त्यांना आतापर्यंत जातीचे दाखले मिळाले नाहीत राजुरा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना SDM बोलले असता त्यांनी दाखले देण्याकरता टाळाटाळ करत आहे SEBC आरक्षण बाबत मला कोणताही GR व माहिती आलेली नाही व पहिले दाखले दिलेले आहेत ते रद्द करेल यापुढे मी दाखले देणार नाही असे त्यांनी सांगितले त्यामुळे मराठा समाजाला जातीचे दाखले मिळत नाहीत आणि मराठा समाजाच्या मनात जातीचे दाखले मिळतील की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे . सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले लागतात व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसईबीसी अंतर्गत काही पदाकरिता जागा राखीव ठेवलेल्या आहेत त्याकरिता जातीच्या दाखले अत्यंत आवश्यक आहे . जातीचा दाखला नसल्यामुळे तो त्या पदाकरिता वंचित राहू नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मराठा समाजांना लवकरात लवकर जातीचे दाखल देण्यात यावे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना SEBC अंतर्गत मराठा समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अशी माहित सबंधित अधिकारी याना देण्यात यावी महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog