Skip to main content
*बेकिंग.....मायभुमि न्युज....आयटक चे जिल्हा परिषद कार्यालय समोर धरणे व निदर्शने.मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी.अन्यथा 28 जून रोजी मुंबई मंत्रालय समोर राज्bयव्यापी तीव्र आंदोलन करणार. कॉ.झोडगे*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण चंद्रपूर:--महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक चे वतीने दिनांक 12/०6/२024 रोजी मानधन वाढीच्या मागणी करिता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर मासिक 2500 रू.तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या हजारो शापोआ कर्मचाऱ्यांनी विशाल धरणे व नारेबाजी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले व त्या नंतर मा.अश्विनी सोनवणे केळकर शिक्षणअधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब,शालेय शिक्षण अव्वर सचिव प्रमोद पाटील यांना ......स्मरण पत्र.. ..दीड हजार रुपये वाढीचा जीआर शाशनाने त्वरित काढावे म्हणून निवेदन देण्यात आले.यापूर्वी आयटक च्या नेतृत्वात 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन वर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मुक्कामी महामोर्चा काढण्यात आला होता ज्या मध्ये लाखो कर्मचारी सहभागी झाले होते.तेव्हा संघटनेला मोर्चामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुढील सत्रामध्ये म्हणजे एक एप्रिल 2024 पासून सध्या मिळत असलेल्या मानधनांमध्ये दीड हजार १५०० रुपये वाढ करण्यात येईल .तसेच शालेय शिक्षण मंत्री,प्रधान सचिव व संघटनेची बैठक घेऊन मानधन वाढ प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाटविले जाईल असे आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता न झाल्याने परत शालेय पोषण आहार कर्मचारी राज्य कमिटीच्या वतीने राज्यभर आंदोलन करून सरकारला मानधन वाढ जी आर तत्काळ काढावे यासाठी स्मरण पत्र देण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज निवेदन देण्यात आले.निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या ज्यामधे वाढत्या महागाई नुसार शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतश्रेणी मिळेपर्यंत मासिक 15000 रू. मानधन देण्यात यावे.चपराशी कम कुक पदावर नियुक्ती देण्यात यावी.सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी.कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करणे बंद करावे.त्यांच्या कामाशिवाय ईतर कामे सांगू नये.सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी.सर्व शाळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे.दरवषी करार नामा करण्याची पद्धती बंद करून त्या ऐवजी कामावर रुजू झाल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे.तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे 12 महिन्याचे मानधन देण्यात यावे.दिवाळी बोनस लागू करण्यात यावे .शाळा व शाळेचा सर्व परिसर झाडण्यास सांगू नये.दर महिन्याला मानधन व इंधनबिल कर्मचाऱ्यांच्या वयक्तिक बँक खात्यात जमा करावे यासह विविध मागण्या बाबत चर्चा करण्यात आली.धरणे आंदोलन चे नेतृत्व संघटनेचे राज्य महासचिव कॉ.विनोद झोडगे ,जिल्हा सचिव कॉ.वनिता कुंठावार, आयटक चे कार्याधक्ष कॉ.रवींद्र उमाटे, कॉ.प्रकाश रेड्डी , कॉ.राजू गैनवार,राज्य संघटक श्रीधर वाढई,कुंदा कोहपरे,रवींद्र बावणे , छाया मोहितकर,कल्पना रायपूरे,शंभू निकुरे, शंबाजी रायवाड,यांनी केले. तात्काळ मानधन वाढ जी आर काढावे अन्यथा पावसाळी अधिवेशनात राज्यव्यापी तीव्र आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे 28 जून 2024 रोजी छेडण्यात येईल असा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog