Skip to main content
बेकिंग.........माय भुमि न्युज,निवेदन मा. तहसीलदार खामगाव नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी :- अभाविप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव कडुन खामगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. व नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ची उच्चस्तरीय व सीबीआय चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. देशात वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) तर्फे NEET UG परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. या वर्षी NEET UG २०२४ परिक्षा २४ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली. देशभरात ०५ मे रोजी झालेल्या NEET UG परीक्षेत अनेक घोटाळे झाल्याची शक्यता देशाच्या वेगवेगळ्या भागातून समोर येत आहे. NEET UG २०२४ चा निकाल ०४ जून रोजी घोषित झाला. त्यात ६७ विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशभरात सर्वोच्च स्थान प्राप्त केले असून, राजस्थान राज्यातील एकाच परिक्षा केंद्रावरील एकूण १४ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे परीक्षेच्या निकाला संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 'काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना वेळ कमी दिला गेल्यामुळे ग्रेस मार्क्स देण्यात आले. त्यमुळे त्यांच्या मार्क्स आणि रैंकिंग मध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.' असे कारण NTA कडून देण्यात येत आहे. परंतु यासंदर्भात कोणत्या सुत्रानुसार गुणांमध्ये वाढ केली आहे व किती विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ केली आहे, याबद्दलची स्पष्टता अद्यापही NTA तर्फे देण्यात आलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये व शिक्षण क्षेत्रामध्ये या निकालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तसेच कित्येक विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवर पेपर आधीच प्रकाशित झाल्याची माहिती देत, प्रश्नपत्रिका फुटीचे देखील आरोप केले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव कडुन नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ची उच्चस्तरीय व सीबीआय चौकशी करून कारवाई करण्यात यावी. *यावेळी जिल्हा सहयोजक ऋषिकेश वाघमारे, नगर मंत्री अनिकेत वरुडकर, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश कठाळे, सानिका राठोड, जागृती नेमाने, आकाश अस्वार कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, राजेश इंगळे खामगाव
Popular posts from this blog