Skip to main content
बेकिंग........... माय भुमि न्युज*लाडकी बहीण योजनेप्रमाणे बांबू लागवड च्या अटी तात्काळ शिथिल करा - कैलास फाटे*खामगाव ( ) : राज्यात प्रायोगिक तत्वावर काही जिल्ह्यात100 टक्के बांबू लागवड योजना राबवली जात आहे. सदर योजनेकरिता कलेक्टर पासून तर रोजगार सेवक पर्यंत सर्व यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्या करिता मेहनत घेत आहेत. शेतकऱ्यांमध्ये सुध्दा पारंपरिक पिकांसोबत नवीन काहीतरी प्रयोग करण्याची इच्छा आहे परंतू शासनाच्या जाचक अडचणींमुळे शेतकऱ्यांना योजना घेता येत नाही, ज्यांना घेता येते त्यांच्याकडे जमिनीचे कमी क्षेत्र असल्यामुळे त्यांची हिम्मत होत नाही. ही योजना राबवण्यामध्ये फक्त मोठ्या अधिकाऱ्याची लहान अधिकाऱ्यांवर व लहान अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांवर फक्त बंबारी ( चिडचिड ) पाहायला मिळते असे सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी म्हटले. शासनाने अश्या योजना विना अट सर्व शेतकऱ्यांसाठी राबवल्या पाहिजेत. म्हणजे आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांना लाभ घेता येईल व कर्मचाऱ्यांची दमछाक होणार नाही आणि शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित बांबू लागवड योजना शासनाला खरोखर राबवायची असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जाचक अटी क्षणात शिथिल केल्या त्याप्रमाणे बांबू लागवड योजनेतील एकराची मर्यादा, बांधावर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचं क्षेत्र सातबाऱ्यातून कमी होता कामा नये जेणेकरून तो शेतकरी फळबाग लागवड ची योजना सुद्धा सहज घेऊ शकेल. ह्या छोट्याशा अटी शिथिल करा अन्यथा ही योजना देखाव्याप्रमाणे आहे असे जाहीर करा असे निवेदन इमेल द्वारे मुख्यमंत्री व रोजगार हमी योजनेचे टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांना कैलास फाटे यांनी पाठवले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog