Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज*जिवती व सावली तालुक्यातील 1024 घरकुलांना मिळाली मंजूरी.**मंञी, ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारशीने घरकुल मंजूर.**चंद्रपूर जिल्हा भाजयुमो.चे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांच्या सततच्या पाठपुराव्याल यश.*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.कृष्णा चव्हाण *जिवती :-* जिवती तालुक्यातील अनेक लाभार्थी आपल्याला सरकारी घरं मिळतील या आशेवर होते. बेघर लाभार्थी आपल्याला घर मिळणार, याच अपेक्षेवर कित्येक वर्षापासून जीवन जगत असतानाचं; आता जिवती व सावली तालुक्यातील 1024 घरकुल लाभार्थींची प्रतिक्षा संपली आहे. 1024 लाभार्थ्यांना मंञी, मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी शासन निर्णय पारीत करुन घेऊन दिलासा दिलेला आहे. शासन निर्णयान्वये चंद्रपूर जिल्हयातील 1024 घरकुलांना शासनांकडून मंजूरी मिळाली असून, घरकुलसाठी पाञ असलेल्या जिवती तालुक्याकरीता 476 पाञ लाभार्थ्यांना तसेच सावली तालुक्यातील 548 लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून मंजूरी मिळाली आहे. जिवती व सावली तालुक्यातील एकूण 1024 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर व्हावे, यासाठी मंञी, ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मंञी, इतर बहुजन कल्याण विभाग यांचेकडे शिफारस केली होती. जिवती तालुक्यातील 476 घरकुलांना मंजूरी मिळावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा भाजयुमो.चे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी मंञी, मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचेकडे सतत पाठपुरावा केल्याने हे यश मिळाले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून जिवती तालुक्यातील ग्रा.पं.केकेझरी-1, कुंबेझरी-59, कोदेपूर-18, टाटाकोहाड-2, चोपनगुडा-7, चिखली (खुर्द)-32, चिखली (बु.)-22, दमपूर मोहदा-34, धोंडाअर्जूनी-23, नंदप्पा-11, पाटण-9, पिट्टीगुडा नं.2-50, गुडशेला-55, आसापूर-45, सेवादासनगर-20, मरकलमेटा-14, लांबोरी-12, मरकागोंदी-7, सोरेकसा-30, टेकामांडवा-13, खडकी हिरापूर-12 असे एकूण 476 घरकुल मंजूर झाल्याचे शासन निर्णय पारीत झाल्याने, घरकुल लाभार्थीनी आनंद व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog