Skip to main content
*जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पुडियाल मोहदा येथे 'वृक्षदिंडी' व 'ग्रंथदिंडी'चे आयोजन.* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती - आज दि. 13 जुलै, 2024 रोजी जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पुडियाल मोहदा येथे सकाळी 8 वाजता 'वृक्षदिंडी' व 'ग्रंथदिंडी'ची सर्व विद्यार्थ्यांसमवेत सर्व शिक्षक तथा ग्रामस्थ पालकांसह जनजागृती फेरी काढण्यात आली या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशात "झाडे लावा, झाडे जगवा", " ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा," " वृक्ष हेच आपले मित्र" इत्यादी प्रकारची घोषवाक्य देत शाळेपासून गावापर्यंत जनजागृती केली. शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री .आर.के. घोडके सर, विषय शिक्षक मा. श्री .बी.बी .सोळंके सर ,सहशिक्षक मा.श्री. आर .एस. बनकर सर व सहशिक्षक मा.श्री .एम .बी .लबडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. हरेश्वर पुष्पपोळ, शिक्षण प्रेमी मा. श्री. रामराव इंगळे , ग्रामपंचायत उपसरपंच मा.श्री. दत्तात्रय कांबळे आणि तंटामुक्त अध्यक्ष मा. श्री हरिश्चंद्र जाधव तसेच अंगणवाडी सेविका गीता नगराळे इत्यादी उपस्थित होते. गावातून परतल्यानंतर कार्यक्रमाच्या अंतिम, मा. श्री. रामचंद्र पुष्पपोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना 'वृक्षारोपणा'चे महत्त्व पटवून दिले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog