Skip to main content
पोस्टे हिवरखेड ...... माय भुमि न्युज गळफास घेऊन आत्महत्या काल दि.22.07.24 रोजी ग्राम शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे वय 23 वर्ष रा.शिराळा ता.खामगाव या इसमाने मेंढ्या चारत असतांना गळफास घेऊन आत्महत्या केली.पो . स्टे हिवरखेड अंतर्गत ग्राम शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे वय 23 वर्ष हा ईसम मेंढी पालन करीता मालगीरी टेकड्या जवळ त्याचा मावसभावासह वाड्यावर राहत होता.काल दि.21.07.24 रोजी सकाळी 10.00 वा सुमारास त्याने त्याच्या मेंढ्या चारण्यासाठी मालगीरी बाबा मंदीराचे मागे अकोली शिवारात नेल्या होत्या.दुपारी 04.00 वा सुमारास त्याच्या मेंढ्या परत आल्या परंतु तो परत आला नाही.म्हणुन त्याचा मावसभाऊ नंदु चंदु मासाळ व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता त्याने मालगीरी टेकड्यावर अजनाचे झाडाला गळफास घेऊन मरण पावलालेला दिसुन आला.अशा त्याचे काका कैलास हुरमा ठोंबरे या.शिराळा यांनी पोलिस स्टेशन हिवरखेड येथे तक्रार दिल्याने पोलीसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक 16/24 कलम194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार प्रकरण दाखल केले असुन पुढील तपास ठाणेदार कैलास चौधरी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण व नाईक पोलिस काॅन्सटेबल प्रविण जाधव करीत आहेत .......महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆 स्पेशल रिपोर्ट..🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog