Skip to main content
राजुरा विधानसभा निवडणूकीत दिसणार नवा चेहरा... बहुजन मुक्ती पार्टी लढविणार निवडणूक मायभूमी न्युज/ प्रतिनिधी विश्वनाथ झाडे / कोरपणा कोरपणा चंद्रपूर : विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजु लागले. सर्वच राजकीय पक्षांचे संघटनात्मक कामे सुरू झाली. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जोश दिसून येत आहे. राजकीय पक्षाचे उमेदवार कोण राहणार हे अजुन नक्की झाले नसले तरी राजुरा विधासनभा क्षेत्रात प्रथमच बहुजन मुक्ती पार्टी निवडणूक लढविणार असून युवक उमेदवाराला संधी दिल्याने राजुरा विधासनभा निवडणुकीत एक नवा चेहरा समोर येणार आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय वातावरण गरम असतांना विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. अशातच विविध राजकीय पक्ष आणी त्यांची नेतेमंडळी मतांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत लागले आहे. ज्या गावात कधी ढुंकूनही पाहीले नाही अशा गावात भेटी, गावा-गावातील कोणताही कार्यक्रम असो लग्नसमारंभ असो किंवा मय्यत झाली असो त्यांची उपस्थिती अनीवार्य झालेली दिसून येत आहे. नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांमध्येही जोश वाढलेला आहे. माझ्याच नेत्याला पक्षाची उमेदवारी मिळेल असा तोरा कार्यकर्ते गाजवीत असून नेमकी उमेदवारी कुणाला मिळेल याची शाश्वती अजुन तरी कुणीही देऊ शकत नाही.राजुरा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पार्टी व शेतकरी संघटना अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच वंचत बहुजन आघाडी, गोंडवाणा गणतंत्र पार्टी यांची उमेदवाही सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. अशातच बहुजन मुक्ती पार्टी ने सुद्धा आपला उमेदवार जाहिर करून निवडणूकीत चांगलीच रंगत आणली आहे.समग्र शिक्षा गट साधन केंद्र पंचायत समिती मुल येथे उपक्रमाअंतर्गत शासकीय नोकरी चालु असतांनाच राजकारणात प्रवेश करूण थेट राजुरा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे बहुजन मुक्ती पार्टी चे तरूण युवक उमेदवार म्हणून प्रविण रामराव कुमरे यांचे नाव जाहिर झाले आहे.प्रविण कुमरे हे राजुरा येथील रहीवाशी असून त्यांचे बी.ए. बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून ते सध्या समग्र शिक्षा अंतर्गत गट साधन केंद्र पंचायत समिती मुल येथे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. भारतीय जिवन विमा निगम चे विमा प्रतिनिधी म्हणून सुद्धा ते काम करतात. समग्र शिक्षा अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाचे नागपूर विभागीय अध्यक्ष, समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रमिक संघ जिल्हा चंद्रपूर चे जिल्हा सचिव तसेच बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसह नागकरीकांच्या समस्यांना ते कायदेशिर मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.बेरोजगारी, कंत्राटीकरण, खाजगीकरण, शासकीय रिक्त पदे भरणे, जुन पेंशन योजना लागु करणे, शेतमालाला भाव, सिंचनाचा प्रश्न, शेतकऱ्यांचे विविध समस्या अशा प्रकारच्या अनेक समस्यांना निस्तारण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला असून त्यांनी चुनावी घोषणा सुद्धा जाहिर केल्या आहेत. मात्र येणारा काळच ठरवेल की प्रविण कुमरे हे कितपत मतदारांच्या आशा आणि विश्वासाला खरे ठरतात. त्यांच्या उमेदवारीमुळे मात्र राजुरा विधानसभा क्षेत्रात चांगलेच चर्चेला उधान आले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो 9850835306 प्रतिनिधी विश्वनाथ झाडे कोरपना चंद्रपूर
Popular posts from this blog