Skip to main content
बेकिंग.......... माय भुमि न्युज,*जिवती भाजपच्या तालुकाध्यक्षपदी नव्या चेह-याला संधी; तालुकाध्यक्षपदी दत्ताजी राठोड यांची वर्णी*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.*जिवती :-* भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवड (दि.06/08/24) रोजी पक्षश्रेष्ठींनी जाहीर केली. निवडीत ग्रामीण भागातील नव्या चेह-याला संधी देत सेवादासनगर येथील दत्ताजी राठोड यांच्या नावावर कोअर कमिटीने शिक्कामोर्तब केला. भाजप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी पञकार परिषदेत या निवडीची घोषणा केली.*राठोड यांना संधी का?*दत्ताजी राठोड हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. राठोड हा एक नवा चेहरा म्हणून पक्ष त्यांच्याकडे पाहत आहे. ते पक्षात शांत व सयंमी स्वभावामूळे परिचित आहे. नविन चेहरा पुढे करुन ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला संधी दिल्याचा चांगला संदेश पोहोचविण्यासाठी त्यांना संधी दिली गेली आहे. त्यांनी यापूर्वी खडकी रायपूर-पुडीयाल मोहदा जिल्हा परिषद क्षेञात त्यांच्या अर्धांगिणींस जि.प.सदस्यपदी निवडून आणून; सदर क्षेञात जि.प.सदस्यांच्या माध्यमातून विकासाचा पाया रोवल्याने व पक्षाने दिलेल्या जबाबदा-या यशस्वीरित्या पार पाडल्यामूळे त्यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. दत्ताजी राठोड पक्षात महामंञी असतांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.दत्ताजी राठोड यांची भाजप तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog