Skip to main content
बेकिंग........ माय भुमि न्युज,*स्वर्गीय अर्जुनराव निवृत्ती गोतावळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे महाविद्यालय व जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यांचे वाटप*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती --जिवती तालुक्यातील कुंभेजरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अर्जुनराव निवृत्ती गोतावळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चारही मुलांनी वडिलांच्या या पुण्यतिथी वर होणारा खर्च टाळून दरवर्षी ते स्मृतिदिनानिमित्त शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. याही वर्षी त्यांनी वडिलांच्या समृती दिनी अन्नधान्य व भोजन व इतर कार्यक्रमावरचा खर्च टाळून अण्णाभाऊ साठे विद्यालय येथील 120 विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेजरी येथील 125 विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकामांडवा येथील 127 विद्यार्थ्यांना मुलांना शाळेत अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू वह्या, पेन, खोडरबल, पेन्सिल, कंपास, पाऊच, स्केल, बॉटल, व इतर शालेय उपयोगी असणारे साहित्य व काही पुस्तके विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यात आले. अशा या कार्यक्रमासाठी सर्वच शाळेतील मुख्याध्यापक श्री पाच भाई सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा. सुग्रीव गोतावळे श्री लोडे सर श्री मालेकर सर श्री जीवन सर श्री.पेंदोर सर श्री वाघमारे सर, बुचे मॅडम श्री डवरे सर श्री गोविंद आखरे श्री उल्हास पवार श्री भानुदास जाधव श्री बोरीकर सर श्री मोतीवाड श्री ज्ञानोबा आकृपे यांच्या उपस्थितीमध्ये साहित्य वाटप करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक श्री निब्रड सर डॉ. अंकुश गोतावळे श्री लहुजी गोतावळे श्री संतोष गोतावळे पोलीस पाटील श्री प्रकाश राठोड श्री विठ्ठल राठोड यांच्या उपस्थित साहित्य वाटप करण्यात आले. तर टेकामांडवा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक श्री एल एम पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली 127 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सहशिक्षिका जयश्री घोळवे, पायल कुकडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री शेषराव देवकते श्री फुलचंद तांबरे श्री दीपक गोतावळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचलन श्री वाघमारे सर यांनी केले. तर आभार श्री वावरे सर यांनी मानले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog