Skip to main content
बेकिंग........... माय भुमि न्युज,*लक्ष ठरवून सतत मेहनत करणारेच यशस्वी होते - अनिकेत दुर्गे*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण गडचांदूर - येथील प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेला मा. अनिकेत दुर्गे यांनी आपल्या ओजस्वी भाषणाद्वारे विद्यार्थांना मेहनत आणि सतत अभ्यास करण्यासाठी विद्यार्थांना प्रोत्साहित केले. विद्यार्थांनी आपल्या गुरुजन आणि माता पित्याना सन्मानाने वागणूक द्यावी कारण ते तुमच्याच सुखासाठी नेहमी झटतात, असे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. अध्यक्षस्थानी प्रा. अरविंद मुसने सर् होते. तर प्रास्ताविक प्रा. धोटे सरांनी मांडला. प्रा. प्रशांत सरकार सर यांनी ही विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. एकता गेडाम यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रा. एकरे मॅडमने केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थांनी मेहनत घेतली. या प्रसंगी बी. ए. भाग 2 व भाग 3 कडून भाग 1 च्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog