Skip to main content
बेकिंग.......मायभुमि न्युज,लाल बहादूर शास्त्री विद्यालय गडचांदूर येथे दही हंडी(जन्माष्टमी) कार्यक्रम संपन्न.......चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,कृष्णा चव्हाण .गडचंदुर -लाल बहादूर शास्त्री विद्यालय तथा प्राथमिक विद्यामंदिर गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारी गोपाळकाला आणि दहीहंडी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साई शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री माननीय गोपाल मालपाणी साहेब उपस्थित होते.. सरांनी महाभारत रामायण या ग्रंथाचे वाचन करावे असे संदेश देऊन, त्याचबरोबर आपला देश विविधतेने नटलेला आहे. विविध जाती धर्माचे पंथाचे लोकांना एकत्र राहुन राष्ट्रा विकास साधता येईल.असे अनेक बाबी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती गडचांदूर शहरातील उद्योजक धनंजय छाजेड, संजय चांडक विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. गडचांदूर शहरातील मान्यवर उपस्थिती होती आणि कार्यक्रमातून दिपक झाडे सर श्रीकृष्णाचा अनेक प्रकारच्या हिंदू संस्कृतीचे विषयी माहिती सांगण्यात आले. मनोगतामध्ये सन्माननीय तांकसाडे मॅडम यांनी श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी सांगून माणूस हा विचार घेऊन मोठा होतं असतो त्याचे स्पष्टीकरण सांगितले, यांनी भारत देशातील नृत्य बदल माहिती सांगितली. कार्यक्रमाची प्रस्तावना विघालयाचे मुख्याध्यापक श्रीधर काळे सर यांनी केली विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले.कार्यक्रमात राधा कृष्णावर अनेक प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन गेडाम मॅडम यांनी केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन जीवने सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री सागर गुडेल्लीवार सर, श्री राठोड सर असुन उपस्थित असलेले पाझारे सर ,झाडे सर,वडस्कर मॅडम, बुच्चे सर, खारकर सर सर्व शिक्षक शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी सहकार्य लाभले. विद्यालयात मोठ्या उत्साहाने दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर,9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog