Skip to main content
*बेकिंग.......... माय भुमि न्युज,जिवती तहसील कार्यालय मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती -भारतीय स्वतंत्र्याचे 78 व्या वर्धापन दिन दिनांक 15 ऑगस्ट 2024 हा दिवस सर्व भारतभर साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिवती तालुक्यात तहसील कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार आदरणीय श्री.अविनाश . एस.शेबटवाड साहेब यांचे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच जिवती येथील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. पोलीस विभागामार्फत सशस्त्र पोलिसांनी ध्वजाला सलामी दिली. जिवती येथील शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध नृत्य सादर केले. तसेच तहसील कार्यालयातील उत्कृष्ट काम करणारे श्री. प्रदीप एच.शिल नायब तहसीलदार जिवती.श्री.दिलीप पोडे मंडळ अधिकारी पाटण,श्री.सचिन नन्नावरे पुरवठा निरीक्षक,श्री.निशांत मालेकर तलाठी,श्री.राजहंस एल.पिपरे मह.सहा.श्री.बळी एल. पेंदोर शिपाई व जितेंद्र मेश्राम शिपाई यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहेत.त्याप्रमाणे तालुक्यातील श्री.हर्षल सुनील येरमे ,कु.रंजना नामदेव गेडाम रा.जिवती व रूपा रामू कोवे रा.धोडाअर्जूनी हे तीनही आदिवासी विद्यार्थी सिईटी परीक्षेत पास झाल्यामुळे त्यांना मा.तहसीलदार जिवती यांनी पुष्प गुच्छ देवून सत्कार केला पण महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog