Skip to main content
बेकिंग............. माय भुमि न्युज,जागतीक आदिवासी दिनानिमित्त अस्तित्वाच्या लढाईसाठी एकजूट दाखवण्याचा निर्धार!--------------------------------------समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर समाजाचा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ताकद निर्माण करा- गजानन पाटील जुमनाके ,-------------------------------------------------'एक तीर-एक कमान, आदिवासी एक समान' च्या जयघोषाने दुमदुमला जिवती तालुका !चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती:- जिवती तालुक्यात कला, जिवन शैली, वेशभूषा आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवीत शहरातून 9 ऑगस्ट ला निघालेल्या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधले. या निमित्ताने जागतिक आदिवासी दिनाचे यावेळी पारंपारिक आदिवासी गोंडी गीतांवर तरुणांची पावले थिरकली. महिलांचा लक्षणीय सहभाग होता. आदिवासी दिनानिमित्त मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीच्या वतीने दुपारी एक वाजता हजारोच्या संख्येने आदिवासी समुदाय सहभाग होऊन रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून स्व.गोदरू पाटील जुमनाके,क्रांतिवीर बाबुराव शेडमाके व जननायक बिरसा मुंडा चौकात ध्वजारोहण करण्यात आले व शहरात क्रांतिवीर श्यामा दादा कोलाम यांच्या चौकातील फलकाचे अनावरण करून गजानन पाटील जुमनाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नियोजित आदिवासी शासकीय आश्रम शाळा येथे कार्यक्रमात थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते, गजानन पाटील जुमनाके तर मार्गदर्शक ग्राम आरोग्य सेनाचे डॉ. प्रवीण येरमे, गोंदोला समूहाच्या डॉ. शारदा प्रवीण येरमे, विचारवंत व्यक्ते प्रा.डॉ.विठ्ठल आत्राम तर प्रमूख अतिथी म्हणून ठाणेदार राजपुरोहित, तहसीलदार अविनाश संबटवाड, वनपरिक्षेत्रधिकारी लेंडगे,नायब तहसीलदार सहारे,माजी सभापती भीमराव पाटील मेश्राम, सतलुबाई जुमनाके,नगरसेविका,शामराव गेडाम नगरसेवक, भोजी पाटील आत्राममाजी सरपंच,भीमराव पाटील जुमनाके सामाजिक नेते, शामराव सलाम सामाजिक कार्यकर्ते, लक्ष्मीबाई जुनानाके नगरसेविका, अनिता धुर्वे माजी सरपंच, कृष्णा सिडाम नगरसेवक,हनुमंत कुमरे माजी सरपंच, सोनेराव पेन्दोर माजी सरपंच, झाडू पाटील कोडापे माजी सरपंच, बाजीराव वलका माजी सरपंच, डॉ.नागनाथ डुडुले , हनुमंत कुमरे,कोलाम समाजाचे ज्येष्ठ नेते मारू आत्राम , झाडू कोडापे मा.सरपंच, शंकर सिडाम टांगाळा जलपत कोडापे सरपंच आदीं उपस्थिती होते. गुणवंत प्राप्त कमल येटेवाड, ममता कोवे , हर्षल येरमे अशा अनेक विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार व सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले संजय तोडासे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात गजानन पाटील जुमनाके यांनी समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर समाजाचा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ताकद निर्माण करा असे मत व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.प्रवीण येरमे आदिवासी समाजाची बोलीभाषा व संस्कृती पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे व समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करावी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजातील नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे असे म्हणाले तर प्रा. डॉ. विठ्ठल आत्राम यांनी युनोमार्फत यावर्षी जागतिक आदिवासी लोकांच्या 2024 च्या आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम स्वैच्छिक अलगाव आणि प्रारंभिक संपर्कात स्थानिक लोकांच्या हक्काचे संरक्षण करणे यावर प्रकाश टाकत आदिवासीवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड पुकारले पाहिजे व आदिवासीचे आरक्षण जाती-जातीत वर्गवारी करून समाजामध्ये ते निर्माण करण्यात येत असून त्यासाठी स्वतःच अस्मितेचा प्रश्न अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी विधानसभेत पाठवण्यासाठी तालुक्यातून एक नेतृत्व निर्माण केले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले.त्याचबरोबर तहसीलदार अविनाश शेंबटवाड आदिवासी समाजाबद्दल संस्कृती चालीरीती जतन केले पाहिजे 'जिवती दि लास्ट पॅराडीस 'हे आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेला आहे म्हणाले तर ठाणेदार राजपुरोहित आदिवासी समाजात तंटे भांडणे गावातच निराकरण करतात न्याय व्यवस्था चांगली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी लंगडे यांनी सर्व आदिवासी बांधवांना सहकार्य करण्याची आश्वासन दिले. डॉ.शारदा येरमे यांनी मातृशक्तीवर तर कु.अश्विनी कोरांगे हिने आजचे तरुण, शिक्षण आणि समाजात त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकलेया कार्यक्रमाला तालुक्यातील जनसमुदाय आदिवासी संस्कृतचे दर्शन घडवीत हजारोच्या समाज बांधव उपस्थित होते. आंध जमातीचे प्रतिनिधित्व करत डॉ.नागनाथ डूडूळे साहेब यांनी आदिवासी आरोग्य या विषयावर समाजाला संबोधित केलेया कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम व सूत्रसंचालन लिंगोराव सोयाम सर तर आभार संकेत कुडमेथे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी साठी शिवाजी नैताम, आनंदराव शेडमाके, गंगू गेडाम, अनिल आडे, बालाजी मडावी,ईशतराव आत्राम, सुरेश कोडापे, संतोष सलाम, सित्रू गेडाम, भीमराव मेश्राम, चैनराव मडावी, गंगू आत्राम, केशव कुमरे, विजय जुमनाके, नागेश मेश्राम, शंकर गेडाम, गोविंदराव कन्नाके, जुगदराव सिडाम, मोतीराम सिडाम, भीमराव कन्नाके. लच्चू सोयाम , दिनेश सोयाम, गोचू पेंदोर, मारुती सिडाम, केशवराव कुमरे, लचु वलका, गंगाधर आत्राम , मोहन आत्राम, संभा पेंदोर याबरोबरच प्रत्येक गावातील गाव पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो 9527249856
Popular posts from this blog