Skip to main content
*बेकिंग........माय भुमि न्युज,लोकांनी अण्णाभाऊच्या फकिरा सारखे लढले पाहिजे - भूषण फूसे*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती - लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांची फकिरा कादंबरी वाटप करण्यात आली.या कादंबरीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त असून या कादंबरीत समाजाच्या फकिरा नावाचा विर इंग्रजांविरुद्ध लढतो आहे.इंग्रज विरुद्ध लढून गोर गरीब लोकांना मदत करतो.हा फकिरा समाजाला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण फुसे यांनी उपस्थित लोकांना विनामुल्य फकिरा कादंबरी वाटप केली.यावेळी पाहुणे म्हणून ज्योती नळे,सामाजिक कार्यकर्ते लता डुकरे,मेघा फुसे यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे यांचा फकिरा हा एका समाजाचे नेतृत्व करीत नाही तर संपूर्ण समाजाचे नेतृत्व केले आहे.म्हणून समाजाने अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा सारखे लढले पाहिजे.देशात गोरगरिबांचे शोषण होत आहे.अण्णाभाऊ साठे यांनी गोरगरिबांची व्यथा,कथा मांडली परंतु सरकार याच गोरगरीब जनतेला वेठीस धरले आहे.यावेळी जिवती तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला,पुरुष शेतकरी बांधव उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थ्यांना नोट बुक भेट देऊन कार्यक्रम पार पडला.सूत्रसंचालन व्यंकटी हरगीले यांनी मानले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog