Skip to main content
बेकिंग.......... माय भुमि न्युज,*पल्लेझरी येथे भव्य काँग्रेस कार्यकर्ता मेळावा : विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती :-- जिवती तालुक्यातील मौजा पल्लेझरी येथे भव्य काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात बाबाजी कर्ले, रमेश भालेराव, हरिश्चंद्र राठोड, शिवाजी राठोड, तिरुपती देवकते, छायाबाई आदे, चंद्रकला आदे, पुष्पा निमार्डे यासह अनेकांचा समावेश आहे. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेसमध्ये स्वागत केले, शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी सभापती प्रा. सुग्रीव गोतावळे, महिला काँग्रेस अध्यक्षा नंदाताई मुसने, सरपंच दुर्पताबाई सिडाम, किरण पांचाळ, सुमनबाई शेळके, उपसरपंच शेख लाला, ताजूदिन शेख, भीमराव महाराज दत्ताजी गायकवाड, बालाजी कर्ले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ताजी गायकवाड यांनी केले. संचलन बंडोजी राठोड यांनी तर आभार मस्तान पठाण यांनी मांनले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog