Skip to main content
बेकिंग................ माय भुमि न्युज,*भाजपाचे तालुकास्तरीय अधिवेशन विदर्भ महाविद्यालय, जिवती*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.कृष्णा चव्हाण.जिवती -भारतीय जनता पार्टी जिवती मंडळाचे तालुकास्तरीय अधिवेशन आज स्थानिक विदर्भ महाविद्यालय (स्व. संजय पवार सभागृह) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले; याठिकाणी उपस्थित राहून तालुक्यातून एकत्र जमलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना संबोधित केले.आपल्या केंद्र व राज्य सरकाराच्या लोककल्याणकारी योजना, लोकहिताचे उपक्रम, शासन निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवून गोरगरिब, शेतकरी, शेतमजूर, युवा, महिला, आदिवासी, निराधार व वंचित बांधवाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसोबतच समाजातील सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आता प्रचंड मेहनत घ्यायची आहे. बुथ प्रमुखापासून ते तालुका प्रमुखापर्यंत सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणीसाठी कामाला सुरुवात करावी, प्रत्येकानी स्वतःचे संघटनात्मक वेळापत्रक तयार करुन गावागावात भाजपचा विचार, आपल्या पक्षाची भूमिका मा. मोदीजींच्या नेतृत्वात होत असलेली ऐतिहासिक विकासकामे पहाडावर सर्वदूर पोहचतील याकडे लक्ष घ्यावे. असे आवाहन याप्रसंगी संबोधनातून केले. प्रसंगीच यादरम्यान अनेकांनी भाजपात पक्षप्रवेश केला, त्यांचेही मनापासून स्वागत केले.यावेळी मंचावर माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, अनु. जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, महामंत्री तुकाराम वारलवाड, प्रल्हाद मदने, गोविंद टोकरे, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री सतीश उपलंचेवार, राजुरा तालुका महामंत्री वामन तुराणकर, सुरेश धोटे, गोवर्धन चव्हाण, संतोष जाधव, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा अंजनाताई पवार, महामंत्री चेतना राठोड, रसीका जाधव, शहराध्यक्षा पुष्पाताई सोयाम, उर्मिला बेल्लाळे, व्यापारी आघाडीचे विठ्ठल चव्हाण, अनु जमाती मोर्चाचे सुनील मडावी, रमाकांत जंगापल्ले, भाजयुमोचे अंबादास कंचकटले, राजेश राठोड, राजेश अक्षय सोलनकर, आनंद कदम, अजय खंदारे, मुनीर सय्यद, शेख फरीद, किशोर चांदूरे चंद्रकांत घोडके, बालाजी जाधव, चंद्रकांत राठोड, नामदेव सलगर, दिगांबर आंबटवार यांचेसह इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog