Skip to main content
बेकिंग............ माय भुमि न्युज,*गडचांदुर ते भोयगाव रोडवरील होणाऱ्या अपघातावर तात्काळ उपयोजना करा* *भाजपा तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार यांची मागणी*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.गडचांदुर - दिनांक २०- गडचांदुर ते भोयगाव रोडची फार मोठी दयनीय अवस्था होती.तेव्हा त्या रोडच्या कामा करीता महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री सन्मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी निधी प्राप्त केली. व आज च्या घडीला टापोटाप रोड तयार झाला त्यामुळे या रोड वरून वाहनाची मोठी वर्दळ चालू झाली.आणि सर्वी कडून सुधीर भाऊंचे आभार होत आहे.मात्र त्या रोड च्या ठेकेदारानी टर्निंग पॉइंट ठिकाणी रिफ्लेक्टर लावले नाही. अनेक ट्रक ड्रायव्हर आपली गाडी लावून आराम करतात. व त्या गाडीला रिफ्लेक्टर लावले नसल्याने त्या उभ्या गाड़ीला अनेक गाड्या धडकून अपघात झाले.कित्येकांना प्राण गमवावा लागले.असे असताना मात्र पोलीस विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. तरी पोलीस विभागानी तात्काळ संबधित विभागाकडून ठीक ठीकानी रिफ्लेक्टर लावण्याची व्यवस्था करावी आणि रोड च्या कडेला रात्रीच्या वेळेस रिफ्लेक्टर न लावता गाड्या उभा करतात त्यांचे विरुध्द सात दिवसाचे आत कार्यवाही करावी.अन्यथा स्थानिक प्रशासना विरुध्द आंदोलन छेडण्यात येईल.अश्या प्रकारचा इशारा भाजपा कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेचवार यांनी दिला यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महेश शर्मा,गोपाल मालपानी, अरविंद कोरे,भाजपाचे गडचांदुर शहर अध्यक्ष अरविंद डोहे,शहर महामंत्री हरिभाऊ घोरे, रामसेवक मोरे,शंकर आपुरकर, भाजप नेते धनराज विरूटकर, महालिंग कंठाले,आदी उपस्थित होते. आता पोलीस विभाग काय सकारात्मक कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog